‘पद्मावत’नंतर करणी सेनेचा ‘मणिकर्णिके’ला विरोध

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

मणिकर्णिका चित्रपटात झाशीच्या राणी संदर्भात आक्षेपार्ह चित्रण केल्याने विरोध करत आंदोलन करणार असल्याचा ईशारा करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुकदेव सिंग शेखावत यांनी दिला. नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पद्मावत चित्रपटाला करणी सेनेने केलेल्या विरोधानंतर देशभरात हिंसाचार उसळला होता. तसेच चित्रपटामध्येही अनेक बदल करण्यास भाग पाडले होते. आता मणिकर्णिका चित्रपटालाही करणी सेनेने विरोध केल्याने पुढे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

[amazon_link asins=’B07CKDTBSL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4d804528-b197-11e8-91ae-85e75d82d423′]

झाशीची राणी एका ब्रिटिश व्यक्तीशी प्रेम करते, अशा प्रकारचे दृष्य या चित्रपटात आहे. त्यामुळे या चित्रपटातून हा आक्षेपार्ह भाग वगळावा, अन्यथा निर्मात्याला घरात घुसून मारू, अशी धमकी करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुकदेव सिंग शेखावत यांनी नाशिकमध्ये दिली.

जाहीरात

शेखावत म्हणाले, सध्या काही चित्रपटात भारतीय संस्कृती आणि इतिहास संदर्भात खोटी माहिती पसरवण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारच्या चित्रपटाना आमचा विरोध कायम असणार आहे, असे शेखावत म्हणाले. दरम्यान, महिला संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्यावरही शेखावत यांनी टीका केली. अशा लोकप्रतिनिधींचे चपलांचा हार घालून स्वागत करावे, असे आवाहन शेखावत यांनी नागरिकांना केले.[amazon_link asins=’B0734VLDTC,B009WNA9V6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5f54a191-b197-11e8-8f2f-1f422adee519′]