COVID-19 ची लक्षणं दिसल्यानंतर अभिनेत्री जोया मोरानी ‘अड्मिट’, बहिणीची कोरोना टेस्ट ‘Posotive’ !

पोलीसनामा ऑनलाईन :शाहरुख खानचा सुपरहिट सिनेमा चेन्नई एक्सप्रेसचे प्रोड्युसर करीम मोरानी यांची मुलगी शाजा हिला कोरोनाची लागण झाली होती. शाजाच्या लेटेस्ट टेस्टमध्ये ती पॉझिटीव असल्याचं समोर आलं होतं यानंतर आता करीम यांची दुसरी मुलगी शाजाची बहिण जोया मोरानी हिला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. जोयामध्येही कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर आता तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे रिपोर्ट अद्याप येणं बाकी आहे.

कोरोनाची शिकार होणारी सिंगर कनिका कूपर ही बॉलिवूडमधील पहिली व्यक्ती होती. यानंतर बी टाऊनमधून आजच कोरोनाची आणखी एक केस समोर आली होती ती म्हणजे शाजा मोरानी.

शाजा हिला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तर जोयाला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार शाजामध्ये कोणतीही लक्षण दिसत नसूनही तिचा रिपोर्ट पॉझिटीव आला आहे. जोयामध्ये फ्लूची लक्षणं दिसत आहेत. परंतु तिचे रिपोर्ट मात्र निगेटीव आले आहेत.

एका रिपोर्टनुसार, गेल्या 14 दिवसांपासून हे सगळं सुरू होतं. शाजाच्या एक दिवसानंतर जोयालाही कोल्ड आणि खोकल्याचा त्रास झाला होता. तिला ताप आणि डोकेदुखीही होती. शाजा 7 दिवसांनंतर ठिक झाली. परंतु जोया मात्र आजारीच राहिली. तिला खोकलाही होता. नंतर तिची कॉविड 19 टेस्ट करण्यात आली.

View this post on Instagram

🥽

A post shared by Zoa💫 (@zoamorani) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like