पुण्यात बँक घोटाळ्यानंतर पतसंस्था घोटाळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यामध्ये नुकताच बँक घोटाळा उघडकीस आला. यामध्ये संचालकांना अटक करुन करण्यात आली होती. हा घोटाळा ताजा असताना पुण्यातील एका पतसंस्थेत २५ लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष, संचालक, शाखा अधिकारी यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष विजय उर्फ भारत अलगंडे आणि शाखा अधिकारी शिवशंकर सांगडे याच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गौतम मैदकर (वय-५७ रा. शिवणे, पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
[amazon_link asins=’B01N4BBOES’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d54a3ca7-787c-11e8-9fe9-7bf1060d386a’]

परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि.मी. या पतसंस्थेच्या संचालकांनी जादा व्याज देण्याचे अमिष दाखवून या पतसंस्थेच्या सगळीकडे शाखा असल्याचे मैदकर यांना सांगितले. मैदकर यांचा आणि त्यांच्या पत्नीचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडून २५ लाख रुपयांच्या मुदत ठेवी स्विकारल्या. सहा महिन्यानंतर त्यांनी पतसंस्थेकडे पैसे आणि व्याजाची मागणी केली. त्यावेली पतसंस्थेने रक्कमेचे फक्त सहा महिन्यांचे व्याज देवून मुद्दल दिले नाही. तसेच पतसंस्था बंद करुन शाखा अधिकारी, संचालक, आणि संस्थापक अध्यक्ष हे पळून गेले.

मैदकर यांनी शाखा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता पतसंस्था बंद झाली आहे, संचालक आणि अध्यक्ष पळून गेले आहेत. त्यामुळे तुम्हाला पैसे देऊ शकत नाही असे त्यांना सांगण्यात आले. तेसेच या प्रकरणी कोणत्याही पोलीस ठाण्यात फिर्य़ाद द्यायची असेल तर द्या असे सांगून शखा अधिकऱ्यांनी फोन बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मैदकर दांपत्यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. सहायक पोलीस निरीक्षक बापू  पिंगळे तपास करीत आहेत.