पुन्हा एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने स्वत:वरच झाडली गोळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वत: वर गोळी झाडून घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आरपी शर्मा असे असून त्यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी चालवून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही गोळी त्यांच्या मानेला लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना कोलंबिया एशिया रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतय. त्यांना कर्करोगाची लागण झाली होती.

आरपी शर्मा यांनी अनेक मोठ्या प्रकरणात काम केलं आहे. बीएसवाय मंत्रिमंडळातील गृहमंत्री आणि महसूल मंत्री यांना अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरपी शर्मा यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. चुकून गोळी बंदुकीतुन सुटल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी 2018 मध्ये अत्यंत नवाजलेले आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांनी मुंबईत राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली होती.
हिमांशू रॉय यांनी आपल्या तोंडात गोळी चालवली होती. कर्करोगावरील उपचारादरम्यान त्यांनी स्वत:वर गोळी चालवून आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर सुसाइट नोटही सापडली होती. कर्करोगावर सुरु असलेल्या उपचारामुळे त्रस्त व डिप्रेशनमध्ये असल्याने त्यांनी टोकाच पाऊल उचलल्याचं नमूद करण्यात आलं होतं.