फसवणूक प्रकरणी मंगलदास बांदल यांना पुन्हा पोलीस कोठडी; ‘त्या’ प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mangaldas Baddal Fraud | शिवाजीराव भोसले सहकारी बँके( Shivajirao Bhosale Co-operative Bank)त बनावट कर्जप्रकरण सादर करून फसवणूक (Fraud)  प्रकरणी मंगलदास बांदल (Mangaldas Baddal ) यांना पुणे पोलिसां (Pune Police) च्या आर्थिक गुन्हे शाखे (Crimes Branch) ने अटक (Arrest) केली आहे. आज त्यांना कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागाचे माजी सभापती आहेत. शिक्रापूर येथील एका व्यक्तीचे बनावट कागदपत्रे तयार केली होती. त्या आधारे गहाणखत सादर करून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून सव्वा कोटी रुपयांचे कर्ज बांदल यांनी काढले होते. याप्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी बांदल यांना अटक केली होती. सध्या ते येरवडा कारागृहात होते.

मात्र शिवाजीराव भोसले बँक फसवणूक तसेच गैरव्यवहार प्रकरणात बांदल यांचा सहभाग असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांनी बांदल यांना येरवडा कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. त्यांना विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बांदल यांना 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel :- Again pune police arrest Mangaldas Baddal

हे देखील वाचा

फ्लाइंग शिख मिल्खासिंग यांची प्राणज्योत मालविली

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित