अहमदनगर : मोकाट कुत्रे पकडण्याऐवजी त्यांना चक्क शेतात काम करायला पाठवलं (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील मोकाट कुत्री पकडण्यासाठी आम्हाला कंत्राटी कामगार म्हणून कामावर घेतले. परंतु, कुत्रे पकडण्याऐवजी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या शेतात काम करायला पाठवले जात होते, असा खळबळजनक आरोप कंत्राटी कामगारांनी केला आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आज महापालिकेत आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी बोलताना कंत्राटी कामगार म्हणाले की, ‘दोन वर्षांपासून आमचे पगार नाहीत. परंतु अजूनही आमचे बिले निघाले नाहीत.’ कंत्राटी कामगारांच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कोंडवाडा विभागामध्ये स्व. बाबाजी शिंदे हंगामी कर्मचारी म्हणून श्वान पकडण्याचे काम करत होते. गेल्या अनेक वर्षापासून ते या विभागात कार्यरत होते. गेल्या काही वर्षापासून महापालिकेच्या माध्यमातून निर्बीजीकरण व लसीकरणाचे काम एका खाजगी संस्थेमार्फत चालू होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ते काम बंद असून त्यांच्या जागेवर आरोग्य विभागाकडून हंगामी कर्मचारी ठेवून श्वान पकडण्याचे काम चालू आहे.

परंतु श्वान पकडताना हंगामी कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचे संरक्षण देण्यात आलेले नाही. त्यांची नसबंदी व लसीकरण याची कोणतीही सुविधा हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यापासून नव्हती. त्यामुळे मोकाट कुत्र्यांना लसीकरण किंवा मोकाट कुत्र्यांपासून हंगामी कर्मचाऱ्यांना किंवा नागरिकांना कोणता आजार होऊ नये याचे प्रतिबंधात्मक सुविधा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पुरविण्यात आलेल्या नाहीत. तसेच हंगामी कर्मचाऱ्यांचे हेल्थ इन्शुरन्स देखील करण्यात आलेले नाही. दि. 25 ऑगस्ट रोजी बाबाजी शिंदे यांचा डेंग्यूमुळे दुर्देवी मृत्यू महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जी व बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे झालेला आहे. मयत शिंदे यांच्या कुटुंबियांना महापालिकेच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –