मोदी 2.0 सरकारची विशेष योजना ; मोफत ट्रेनिंग अन् 8 हजार रूपयेही मिळतात, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मोदी सरकारने तरुणांच्या कौशल्य विकासासाठी एक विशेष योजना सुरु केली आहे. तरुणांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना व्यवसायाचं प्रशिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे. बेरोजगार तरुणांसाठी देखील ही योजना म्हणजे मोठी सुवर्णसंधी असणार आहे. या ट्रेनिंगची फी सरकार स्वत: भरणार आहे. भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. भारतामध्ये सध्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. या तरुण ऊर्जेला देशाच्या विकासात संधी मिळावी यासाठी सरकारकडून प्रयत्नाचा एक भाग म्हणून या योजनेकडे पाहिले जाते.

काय आहे योजना

ज्या लोकांचं शिक्षण कमी आहे त्यांना रोजगार मिळावा म्हणून सरकार हे प्रशिक्षण देत आहे. या योजनेत सरकारकडून तरुणांना ८ हजार रुपये दिले जातात. प्रशिक्षण पूर्ण झाले की सरकार एक सर्टिफिकेट देतं. या सर्टिफिकेटचा वापर देशभर कोठेही करता येणार आहे.

या योजनेअंतर्गत तीन महिने, सहा महिने आणि वर्षाच्या अंतरावर रजिस्ट्रेशन करावं लागतं. यात दिलं जाणारं प्रशिक्षण सेक्टर स्किल काउन्सिल आयोजित करते. त्यानंतर उमेदवार उत्तीर्ण झाले की सरकारी प्रमाणपत्र आणि स्किल कार्ड दिलं जातं. त्यामुळे त्यांना नोकरी मिळणं सोपं जातं.

या योजनेसाठी कसा करायचा अर्ज?

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेसाठी अर्जदाराला आपलं नाव नोंदवावं लागतं.

आपलं नाव, पत्ता आणि ईमेल यांची माहिती भरावी लागते. त्यानंतर अर्जदाराला ज्या एरियात ट्रेनिंग घ्यायचं असेल त्याची निवड करावी लागेल.

या योजनेत कंस्ट्रक्शन, इलेक्ट्राॅनिक्स आणि हार्डवेअर, फूड प्रोसोसिंग, फर्निचर, फिटिंग, हँडिक्राफ्ट, जेम्स, ज्वेलरी आणि लेदर टेक्नाॅलाॅजी असे एकूण ४० कोर्सेस आहेत. यात तरुणांना प्रशिक्षित करून व्यवसाय सुरू करण्यास पात्र बनवले जाते.

या ट्रेनिंगसाठी लागणारी कागदपत्रे

यात योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधारकार्ड, दोन पासपोर्ट साइज फोटो आणि कुटुंबातल्या एका सदस्याचं आधारकार्ड लागतं.

आरोग्य विषयक वृत्त – 

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

एक लिंबू ठरते आरोग्यासाठी फायदेशीर

मधमाशी चावल्यावर वेदना कमी होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा