आसाराम बापूला आणखी एक दणका, १६ मालमत्ता होणार भूईसपाट

अहमदाबाद : वृत्तसंस्था

स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला आणखी एक मोठा दणका बसणार आहे. त्याच्या गुजरातमधील आश्रमाच्या 16 मालमत्तांवर टाच येणार आहे. आश्रमाच्या या सर्व मालमत्ता शेतजमीनीच्या जागेवर विनापरवाना उभारण्यात आल्या आहेत, असा दावा गुजरात महसूल विभागाने केला आहे. त्यामुळे लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

[amazon_link asins=’B079NBHCKM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4e71104c-94a4-11e8-91c8-d923afc665f9′]
आश्रमाच्या 12 रहिवासी आणि चार व्यावसायिक मालमत्तांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे बलात्काराच्या आरोपात तरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसारामच्या मालमत्तांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. आसारामने आपल्या संतपदाच्या जाळ्यात अनेक भक्तांना खेचून अंदाजे 10 हजार कोटींची संपत्ती जमवली आहे. विशेष म्हणजे आसारामच्या मालकीच्या जमिनींची बाजारातील किंमत यामध्ये नाही. आसारामचे जगभरात जवळपास ४०० आश्रम आहेत. एवढेच नाहीतर या आश्रमांच्या मालकीचीही हजारो एकर जमीन आहे.