Ahmednagar ACB Trap | 30 हजार रुपये लाच घेताना दोन लेखा अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – काम मंजूर करण्यासाठी टक्केवारी प्रमाणे 30 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) औरंगाबाद येथील वाल्मी कार्यालयातील (WALMI- Water And Land Management Institute) दोन लेखा अधिकाऱ्यांना (Accounts Officers) औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Ahmednagar ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. प्रदीप प्रल्हाद बाहेकर Pradeep Prahlad Bahekar (वय 47), मोहन दशरथ शेलार Mohan Dashrath Shelar (वय 52 रा.व्हिजन सिटी, औरंगाबाद) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोन लेखा अधिकाऱी यांची नावे आहेत. औरंगाबाद एसीबीने (Ahmednagar ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.30) केली. (Ahmednagar Crime News)

 

याबाबत 29 वर्षीय व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (Ahmednagar ACB Trap) तक्रार केली आहे. लाच घेताना पकडण्यात आलेल्या प्रदीप बाहेकर यांच्याकडे वाल्मी कार्यालय औरंगाबाद प्रशासकीय अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदार यांचे मित्र कॉन्ट्रॅक्टर (Contractor) असून त्यांनी वाल्मी कार्यालय (जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) अंतर्गत एकूण 11 लाख 50 हजार रुपयांचे काम मंजूर झाले आहे. हे काम मंजूर केले म्हणून आणि आणखी 8 लाख 90 हजार रुपयांचे काम मंजूर करण्यासाठी टक्केवारी प्रमाणे 30 हजार रुपये लाचेची मागणी प्रदीप बाहेकर यांनी मागितली. तक्रारदार यांनी याबाबत सोमवारी औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली.

औरंगाबाद एसीबीच्या युनिटने पंचासमक्ष पडताळणी केली असता लेखा अधिकारी प्रदीप बाहेकर यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन स्वीकारण्याचे कबूल केले.
त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून बाहेकर यांच्या सांगण्यावरुन मोहन शेलार यांनी लाचेची रक्कम स्वीकारली.
लाच स्वीकारताच मोहन शेलार यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर प्रदीप बाहेकर यांना ताब्यात घेण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित (DySP Maruti Pandit)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत वारे (Police Inspector Hanumant Vare)
आणि औरंगाबाद एसीबीच्या पथकाने केली.

 

Web Title :- Ahmednagar ACB Trap | Two accounting officers caught in anti-corruption trap while taking Rs 30 thousand bribe Ahmednagar Crime News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | ‘शिंदे गटाच्या उठावामुळे राज्यात राजकीय अस्थिरता;’ आमदार बच्चू कडूंचा शिंदे गटाला घरचा आहेर

Pune Crime News | जेवण न देता दारु पिलेल्या दुसर्‍या पत्नीचा लाथाबुक्क्यांनी केला खून; रिक्षाचालकाला अटक

Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू