HomeशहरअहमदनगरAhmednagar Crime | शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल; 'आधी अश्लील मेसेज पाठवले...

Ahmednagar Crime | शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल; ‘आधी अश्लील मेसेज पाठवले अन्…’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ahmednagar Crime | नगर तालुक्यातील जेऊर येथील शिवसेनेचे (Shiv Sena) पदाधिकारी गोविंद मोकाटे (Govind Mokate) हे अडचणीत आले आहे. गोविंद मोकाटे याच्याविरुद्ध बलात्कार (Rape) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. नगर शहरातील एका महिलेच्या तक्रारीनंतर (Ahmednagar Crime) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दोन वर्षापासून गोविंद मोकाटे संबधित महिलेच्या घरी जाऊन तिला धमकावून अत्याचार करत असल्याचं तक्रारीत नमुद करण्यात आलं आहे.

 

नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गोविंद मोकाटेविरुद्ध (Govind Mokate) बलात्काराचा गुन्हा (Crime of rape) दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने एका सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांकडून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे की, मोकाटे या महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार करत होता. कोणाला काही सांगितलं तर तुला आणि तुझ्या मुलांना मारून टाकीन, अशी धमकीही तो देत होता, त्यामुळे आपण इतके दिवस फिर्याद देण्यासाठी आलो नाही, तर, याशिवाय मोकाटे याने महिलेला सोशल मीडिया आणि मोबाईलवरून संर्पक करूनही त्रास दिल्याचं म्हटलंय. (Ahmednagar Crime)

 

नेमकं महिलेनं तक्रारीत काय म्हटलंय?

2018 पासून गोविंद मोकाटे मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होता. मी 3 वेळा ती नाकारली. त्यानंतर मोकाटे याने मला मेसेज करून महत्वाचं काम आहे, असं सांगत रिक्वेस्ट स्वीकारण्याची विनंती केली. मी कोणी ओळखीचं असेल असं वाटल्याने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर तो सतत अश्लील मेसेज पाठवू लागला. त्यामुळे मी तो नंबर ब्लॉक केला. यानंतर मोकाटे याने माझ्या पतीशी ओळख वाढवून आपण खूप प्रवास करत असल्याने पाठ-कंबर दुखते असे सांगून विनंती करून माझ्या घरी येऊन पतीकडून मसाज करून घेतला. त्यातून ओळख वाढवली. त्यानंतर पती घरी नसतानाही तो येऊ लागला.

 

मला धमकावून अत्याचार करू लागला.
माझे एका पक्षातील मोठ्या लोकांशी संबंध आहेत,
कोणी काही करू शकत नाही, अशा धमक्या देत होता.
अखेर हा प्रकार असह्य झाल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने मी गोविंद अण्णा मोकाटे (Govind Anna Mokate) याच्याविरोधात फिर्याद देत आहे,
असं या महिलेने तक्रारीत म्हटलंय.

 

Web Title :- Ahmednagar Crime | a case has been registered against a shiv sena office bearer Govind Anna Mokate after a complaint was lodged by a woman in the city Tofkhana Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News