Omicron Covid Variant in Maharashtra | अखेर महाराष्ट्रात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव ! कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Omicron Covid Variant in Maharashtra | मागील काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) जगाला धास्ती लावली आहे. अशातच भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला तर आता महाष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Covid Variant in Maharashtra) शिरकाव केला आहे. यामुळे आता महाराष्ट्राची चांगलीच चिंता वाढली आहे.

 

कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra) देखील ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात हा रुग्ण राहत असून, तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई (Dubai)आणि दिल्लीमार्गे मुंबईत (Delhi to Mumbai) आला असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या
33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे.

 

Web Title :- omicron variant in maharashtra omicron infected patient was found in kalyan dombivali area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा