Ahmednagar District Hospital Fire Case | पोलीसनामा इम्पॅक्ट ! अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांना ‘त्या’ प्रकरणात अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ahmednagar District Hospital Fire Case | अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) लागलेल्या आग प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा (District Surgeon Dr. Sunil Pokhrana) यांना दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. तसेच त्यांना अटक (Arrest) करण्यात आली. यापूर्वीच त्यांनी अटकपूर्व जामीन (Pre – Arrest Bail) मिळाल्याने त्यांची जबाब देऊन सुटका करण्यात आली. 30 जानेवारी रोजी ‘पोलीसनामा’ (policenama) वर त्या पंधरा जणांचा दोष काय ? या मथळ्याखाली सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांना अभय दिले जात असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आग प्रकरणातील चौकशी अहवालात प्रथमदर्शनी दोषी आढळून येणारे इतर अधिकारीबाबत अजूनही कडक भुमिका घेण्यात आलेली नाही.

 

आग प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने डॉ. पोखरणा यांना आगीच्या घटनेस दोषी धरले आहे. 6 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली होती. या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला होता. यातील एकाची अजूनही ओळख पटलेली नाही. पोलिसांचा (Ahmednagar Police) तपास (Investigation) सुरू आहे.

 

Web Title :- Ahmednagar District Hospital Fire Case | Impact of Policenama Ahmednagar District Surgeon Dr. Sunil Pokhrana arrested in Ahmednagar District Hospital Fire Case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


LPG Gas Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, 7 मार्चनंतर घरगुती गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार?

 

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा