Ahmednagar News | 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजी विक्रेत्याचा मृतदेह आढळला नदीच्या पात्रात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – येथील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावानजीक नदीच्या पात्रामध्ये एकाचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांनी त्या व्यक्तीची तातडीने चौकशी केली असता ती व्यक्ती एक भाजी विक्रेता (vegetable vendor) असल्याचे निष्पन्न झाले. शंकर उत्तम गलांडे (वय, 31) असे त्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. तीन दिवसापासून गलांडे हे घरी नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

अधिक माहितीनुसार, बेलापूर नजीकच्या प्रवरा नदीच्या पुलावर एक टुव्हीलर आणि नदीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला.
तेथील लोकांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली.
तसेच पोलीस आणि गावचे उपसरपंच घटनास्थळी आले.
टुव्हीलर आणि मृतदेह यांचा काहीतरी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आल्याने टुव्हीलरची तपासणी करण्यात आली.
गाडीला भाजीने भरलेल्या पिशव्या अडकविलेल्या तशाच होत्या.
पिशवीमधील भाजी vegetable vendor सडली होती.
तसेच त्यामध्ये तराजू आणि एक डायरी देखील पोलिसांना सापडली.
गाडी नंबर MH17A. 5198 याचाही तपास केला.
तसेच, डायरीमध्ये शंकर उत्तम गलांडे  असे नाव होते.
त्याच नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्रही होते.
आणि काही फोन नंबर लिहिले होते.
पोलिसांनी त्यावर संपर्क साधला असता, कुटूंबीयांशी संपर्क साधल्याने तेथून कळाले की.
शंकर गलांडे हे गेल्या तीन दिवसापासून घरीच आले नव्हते.

या दरम्यान, नदीच्या पात्रामधून गलांडे याचा मृतदेह बाहेर काढला.
कुटूंबीय यांनी भाजी विक्रेता vegetable vendor गलांडे आणि त्यांचीच दुचाकी असल्याची ओळख दिली.
या घटनेचं कारण अजून समोर आलं नसल्याने पोलिसांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज बांधला गेला आहे.
मृतदेह तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.
याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Also Read This : 

Coronavirus in Pune : पुण्यात 50 दिवसांमध्ये 53 हजार रूग्ण ‘कोरोना’मुक्त

COVID-19 Vaccination | देशभरात 21 जूनपासून मोफत दिली जाणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे

Wab Title : ahmednagar news | ahmednagar missing vegetable vendor found dead in shrirampur river