अहमदनगर : महापालिका कार्यालयात थुंकल्यास दोनशे रुपये दंड

नगरसेवक, वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेच्या कार्यालयात थुंकल्यास २०० रुपये दंड आकारला जाणार आहे. दंड करूनही पुन्हा असा प्रकार घडल्यास संबंधितांवर सार्वजनिक स्वच्छता कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी प्रशासनाला दिले
आहेत. यात नगरसेवक, अधिकाऱ्यांचा कोणाचीही गय केली जाणार नाही.

महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी उपमहापौर मालन ढोणे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेतली. निवेदनावर एस. एस. सगम, आर.बी.पाटोळे, वल्लाळ एस.डी., सौ.चंद्रकला खलचे, केशर जाधव, अनिता लोंढे, जी.एस.धोंगडे, संगीता कोतकर, शितल टिमकारे, सौ.शिरसुळ,सौ.पुंड, श्रीमती अंजली दसरे, वंदना चोथे, मंगल जपकर, मंगल खेडकर, सौ.नंदा वाघमारे, सौ. शेळके रजनी, सौ.नंदा शेजूळ, श्रीमती अनिता घाडगे, श्रीमती वर्षा राणा, व्ही.आर.सारसर आदी महिला उपस्थित होत्या.

याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सध्या अस्वच्छता पसलेली आहे. महिला कर्मचारी व पुरुष कर्मचारी यांच्या स्वच्छतागृहाचे दरवाजाच्या मध्ये एक लाकडी पार्टेशन टाकलेले असून, सदर पार्टेशन जवळ बरेचसे पुरुष कर्मचारी दिवसभर थुंकत असतात. तसेच येणारे जाणारे नागरीकही तेथे थुंकतात. त्यामुळे त्याठिकाणी अतिशय घाण साचलेली आहे. तसेच खूप दुर्गंधी सुटली आहे. तसेच महिलांना स्वच्छतागृहात जाणे सुद्धा अतिशय कठीण झालेले आहे.

याबाबत यापूर्वी तक्रारी केलेल्या आहेत. तरीही कार्यवाही होत नाही. महापालिका कार्यालयातील अस्वच्छते बाबत संबंधितांना योग ते आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. आयुक्त भालसिंग यांनी कार्यालयात पान, तंबाखू, गुटका, मावा खाऊन थुकणारास २०० रुपये दंड करण्याचे आदेश दिले आहेत.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

Loading...
You might also like