नवीन शस्त्रांसह प्रत्युत्तरासाठी हवाई दल तयार : एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारत पाकिस्तान मधील वातावरण जरा जास्तच तणावपूर्ण आहे. काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर दोनीही देशांच्या सीमांवर तणाव वाढत चालला आहे. भारत-पाक सीमेवर पाकिस्तानची कोणतीही आगळीक रोखण्यासाठी हवाई दल नेहमीच सर्तक असते. जोरदार प्रत्युत्तरासाठी आम्ही तयार आहोत,’ असे हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी मंगळवारी सांगितले.

बी. एस. धनोआ आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी संरक्षण साहित्याच्या स्वदेशीकरणासंबंधीच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. प्रत्येक उपकरण परदेशातून आयात करणेही योग्य नाही. आता स्वदेशात विकसित झालेली शस्त्रास्त्रे जुन्या शस्त्रांची जागा घेत आहेत,’ असे धनोआ म्हणाले. हवाई दल पूर्णपणे सक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी यावेळी सांगितले.

आपला देश ४४ वर्षे जुने असलेले मिग २१ हे विमान अजूनही वापरत असल्याचे धनोवा उणी यावेळी अधोरेखित केले.असे असूनही हवाई दल सीमेचे संरक्षण करतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशांच्या सीमांवर कार्यरत असते असेही धनोवा यांनी यावेळी सांगितले.