चिठ्ठीत ‘हे’ लिहून हवाई दलातील जवानाची सर्व्हिस राय़फलने गोळी झाडून आत्महत्या

चंदिगड : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलातील एका जवानाने आपल्या सर्विस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मुळचा बंगळूरूचा रहिवासी असलेल्या जवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे.

मोहन सिंह असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे. तो हवाई दलात लान्स नायक पदावर कार्यरत होता.

मोहन सिंह यांनी २०११ मध्ये भारतीय हवाई दलात नोकरी सुरु केली होती. मागील वर्षी त्यांच पोस्टींग सिरसा एअरपोर्टवर करण्यात आलेलं होतं. दरम्यान दुपारी २ वाजता ड्यूटी संपल्यानंतर त्यांनी आपल्या सर्विस रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेतली. तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. नेमकं आत्महत्येचं कारण काय आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत.

याच वर्षी झाले होते लग्न
मोहन सिंह हे मुळचे बंगळुरु येथील राहणारे आहेत. ते २०११ मध्ये हवाई दलात रुजू झाले होते. दरम्यान २०१९ मध्येच त्यांचे लग्न झाले होते.

आत्महत्येपुर्वी लिहीली चिठ्ठी
मोहन सिंह यांनी आत्महत्या का केली. याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान त्यांनी आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहीली आहे.

काय म्हटले आहे चिठ्ठीत
मोहन सिंह लिहिलेल्या चिठ्ठीत माफी मागितली आहे. मी चांगला मुलगा, चांगला भाऊ झालो नाही. मला माफ कर असं लिहिलं आहे.

You might also like