एअर इंडियाचे विमान सरंक्षक भिंतीला धडकले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

एअर इंडियाचे त्रिचीहून दुबईला जाणारे विमान उड्डाण घेताना तेथील संरक्षक भिंतीला धडकले. या घटनेनंतर या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या विमानातून १३६ प्रवासी प्रवास करीत होते. ते सर्व सुरक्षित आहेत. ही घटना मध्यरात्री दीड वाजता घडली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4552669b-cddb-11e8-ac25-a9f397558ba1′]

एअर इंडिया मागील शुल्ककाष्ट काही केल्या संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. तामिळनाडुतील तिरुचिरापल्ली येथील त्रिची विमानतळावरुन एअर इंडियाचे विमान मध्यरात्री दीड वाजता दुबईला रवाना होत होते. उड्डाणाच्या वेळी त्याने वेळीच टेकआॅफ न घेतल्याने ते विमानतळ नियंत्रण कक्षाचा टॉवर आणि सरंक्षक भिंतीला धडकले. त्यानंतर ही घटना लक्षात आल्यावर वैमानिकाने मुंबई विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना तिथे थांबविण्यात आले असून दुसऱ्या विमानाने त्यांची सोय करण्यात येणार आहे. तांत्रिक कारणामुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B01M7S4KZZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’521d64bf-cddb-11e8-824c-e16de3e3d8e6′]

विमानाने वेळेवर टेकआॅफ घेतला नाही का? विमानात जादा सामान झाल्यामुळे ते वेळेवर आवश्यक त्या उंचीवर गेले नाही का? यात वैमानिकाची चुक होती का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दशकापूर्वी अशाच प्रकारे औरंगाबाद विमानतळावरुन विमानाने टेक आॅफ घेताना जादा वजनामुळे ते वेळेत उंच गेले नाही. त्यामुळे विमानतळाबाहेरील रस्त्यावरुन जाणाऱ्या कापसाने भरलेल्या ट्रकला धडकून विमानाला आग लागली होती. त्या विमानातील सर्वांचा मृत्यु झाला होता. सुदैवाने हे विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरले असून सर्व प्रवासी सुरक्षित राहिले आहेत. या प्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत.

बूस्टर रॉकेट आकाशातच बंद पडल्याने दोन अंतराळवीरांची इमर्जन्सी लँडिंग