आज मध्यरात्रीपासून विमान प्रवास, एसी, वॉशिंग मशिन, फ्रीज महागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

येत्या पाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही जर एसी, वॉशिंग मशिन, फ्रीज अशा वस्तू खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्याकरिता महत्वाची आहे. कारण या वस्तू आता महाग होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने 19 वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. यामध्ये विमान इंधन, वातानुकूलन यंत्रणा (एसी), वॉशिंग मशिन आणि फ्रीजचा समावेश आहे. यामुळे या वस्तूंच्या खरेदीकरिता रक्कम मोजावी लागणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fbc8f0bf-c242-11e8-96ae-e537237e7da8′]

अत्यावश्‍यक गरजेच्या वस्तू नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. मागील आर्थिक वर्षात या 19 वस्तूंची आयात 86 हजार कोटी रुपयांची होती. आयात शुल्कात वाढ करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये स्पीकर्स, रॅडियल कार टायर, दागिने, स्वयंपाकाच्या वस्तू, प्लॅस्टिकच्या काही वस्तू, सुटकेस आदी वस्तूंचा समावेश आहे. नवे आयातशुल्क आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. चालू खात्यावरील तूट आणि भांडवली निधीचा देशातून बाहेर चाललेला ओघ कमी करण्यासाठी सरकारने अत्यावश्‍यक गरजेच्या नसलेल्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध आणण्याची योजना आखली आहे. परकी निधी देशात येण्याचा आणि बाहेर जाण्याचा ओघ यातील फरक म्हणजे चालू खात्यावरील तूट असतो.

अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने काही वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ केली आहे. आयात शुल्कात वाढ केल्याने या वस्तूंची आयात कमी होणार आहे. यामुळे चालू खात्यावरील तूट कमी होईल. एकूण 19 वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

आयात शुल्कवाढ

एकूण वस्तू : 19
आधीचे शुल्क : 10 टक्के
नवीन शुल्क : 20 टक्के

चालू खात्यावरील तूट
एप्रिल ते जून 2018
– जीडीपीच्या 2.4 टक्के

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B0146QJTDC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f1e99fdb-c242-11e8-b051-33b1b04c439e’]