राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या मागे ‘ईडी’चा ससेमिरा ; ११ जूनला ‘ईडी’समोर हजर रहावेच लागणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एअरलाइन सीट अलॉटमेंट या घोटाळ्यात तत्कालीन केंद्रिय उड्डायन मंत्री प्रफुल पटेल यांच्या मागे ईडी या ससेमिरा लागला आहे. आज ईडीच्या समोर हजर राहण्यासाठी त्यांना सांगण्यात आले होते. परंतू आज ते ईडी समोर उपस्थित राहिले नाहीत. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले प्रफुल पटेल यांना दिपक तलवार एविएशन कराराप्रकरणी चौकशीसाठी 6 जूनला म्हणजे आज ईडीला सामोरे जायचे होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल पटेल यांनी हजर राहण्यासाठी काही वेळ मागितला होता. त्यानुसार त्यांना आता 11 जूनला ईडी समोर हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.

ईडीने आरोप लावला आहे की कॉर्पोरेट लॉबिस्ट दिपक तलवार यांच्या सांगण्यावरुन विदेशी प्रायवेट एअरलाइनच्या फेवर मध्ये समझोता करण्यासाठी तत्कालीन नागरिक उड्डान मंत्री प्रफुल पटेल यांच्या संपर्कात राहिले होते. या समझोत्यामुळे भारताच्या एअर इंडियाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले हाेते. ईडीच्या सुत्रांनुसार दिपक तलवार यांची चौकशी केल्यावर झालेल्या खुलाशानंतर आणि खटल्याची तपासणी करतेवेळी ईडीला जे पुरावे मिळाले आहेत त्यावर त्यांना प्रफुल पटेल यांची चौकशी करणे आवश्यक आहे.

यावर तत्कालीन मंत्री प्रफुल पटेल यांनी सांगितले आहे की त्यांना या प्रकणाबाबतचा समन मिळालेला आहे आणि ईडीच्या तपासणीत त्यांना सहयोग करेल. याआधी ईडीने खुलासा केला होता की प्रफुल पटेल यांची दिपक तलवार यांच्या प्रकरणात चौकशी होऊ शकते.