Airtel 365 Days Plan | एक वर्षाच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लान, मिळतील अनलिमिटेड कॉल्स, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Airtel 365 Days Plan | एअरटेल देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीच्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लान आहेत. एअरटेल तुम्हाला एक महिन्यापासून एक वर्षाच्या व्हॅलिडिटीसह प्लान ऑफर करते. (Airtel 365 Days Plan)

 

तुम्ही लाँग टर्म प्लान शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या सर्वात स्वस्त लाँग टर्म प्लानबद्दल माहिती देणार आहोत.

 

तसेच, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये तीन लाँग टर्म प्लान (365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह) आहेत. एअरटेलच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये यूजरला 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. त्याची किंमत आणि उपलब्ध फायदे यांची माहिती जाणून घेऊया. (Airtel 365 Days Plan)

 

Airtel 1799 Prepaid Plan

एअरटेलचा हा प्लान एका वर्षाच्या व्हॅलिडिटीसह येतो. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला वर्षभर रिचार्ज करण्याची गरज नाही. या रिचार्जमध्ये यूजर्सना एकूण 24GB डेटा मिळतो.

24GB डेटा संपल्यानंतर, यूजर्सला 50 पैसे प्रति एमबी डेटा शुल्क भरावे लागेल. मात्र, तुम्ही 4जी व्हाउचर देखील खरेदी करू शकता. हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग लाभासह येतो. म्हणजेच यामध्ये तुम्हाला एक वर्षासाठी मोफत कॉलिंग सेवा मिळत राहील.

यासोबतच यूजर्सना या संपूर्ण प्लानमध्ये 3600 SMS देखील मिळतात. Airtel Thanks अ‍ॅपचाही ग्राहक लाभ घेऊ शकतात. यामध्ये यूजर्सना तीन महिन्यांसाठी Apollo 24/7 Circle सबस्क्रिप्शन, FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक, फ्री हॅलो ट्यून आणि विंक म्युझिक सबस्क्रिप्शन मिळेल.

 

कुणासाठी बेस्ट आहे प्लान ?

जर तुम्ही जास्त डेटा वापरत नसाल तर हा प्लान एक चांगला पर्याय आहे.
मात्र, यामध्ये तुम्हाला 24जीबी डेटा मिळतो, जो व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंगसाठी वापरला जाऊ शकतो.
दुसरीकडे, जर तुम्ही एअरटेलला सेकंडरी सिम म्हणून वापरत असाल तर तुम्ही त्याचा फायदाही घेऊ शकता.

 

Web Title :- Airtel 365 Days Plan | airtel long term plan with 365 days validity airtel rs 1799 prepaid plan

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा