काय सांगता ! होय, Airtel ची भन्नाट ऑफर, 4G मोबाईल खरेदीसाठी देणार Loan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील अग्रेसर असलेली टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांना मोठी खुशखबर आणली आहे. कंपनीने २ जी मोबाइल सर्विसचा वापर करणाऱ्या ग्राहकांना आपल्या पसंतीचा ४ जी स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एअरटेल लोन देणार आहे. त्यासाठी ग्राहकांना डाउन पेमेंट भरावे लागणार आहे. त्यांना एक खास एअरटेल टॅरिफ प्लॅनसोबत हँडसेट मिळणार आहे.

या लोन ऑफरला ‘Zero Extra Cost’ असे नाव देण्यात आले आहे. या ऑफर साठी एअरटेलने IDFC बँकेसोबत समजोता केला आहे. या समजोत्या अंतर्गत योग्य २ जी ग्राहकांना लोन देण्यात येईल. ज्यांना ४ जी आणि ५ जी मोबाइल स्मार्टफोनची गरज आहे. अथवा जे कमीत कमी मागील ६० दिवसांपासून एअरटेल नेटवर्कवर अॅक्टिव वापरकर्ते आहेत. त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

या ऑफर द्वारे एअरटेलच्या लेंडिंग पार्टनरला ३२५९ रुपयांचा एकूण डाउन पेमेंटला ६०३ रुपयांच्या प्रति महिना रुपयांचा ईएमआय अशा रीतीने पे करावे लागतील. १० महिन्यांसाठी लोनची मर्यादा असेल. एकूणच ग्राहकांना यासाठी ९ हजार २८९ रुपये मोजावे लागतील.

कंपनीने सांगितल्यानुसार, ६ हजार ८०० रुपयांच्या या स्मार्टफोन किमतीबरोबर एकूण ओपन मार्केटमध्ये याची किंमत ९ हजार ७३५ रुपये असेल. त्यासोबत एअरटेलचा २८ दिवसांचा बंडल पॅक मिळेल. त्याची किंमत २४९ रुपये असणार आहे. त्यात ग्राहकांना १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. ३३० दिवसांच्या हिशोबाप्रमाणे या ग्राहकांना या पॅकसाठी २९३५ रुपये मोजावे लागतील. अर्थात ग्राहकांना ९७३५ रुपये द्यावे लागतील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like