Airtel Prepaid Offers | एअरटेलनं दिली नववर्षाची भेट ! ‘या’ Prepaid Plans वर डिस्काऊंट आणि इतर फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Airtel Prepaid Offers | काही दिवसांपूर्वी टेलीकॉम ऑपरेटर्सने prepaid plans महाग केले होते. आता कंपन्या नवीन वर्षाच्या अगोदर रिचार्ज करण्यावर ऑफर देत आहेत. नवीन वर्षापूर्वी Airtel सुद्धा आपल्या ग्राहकांना मोबाइल रिचार्जवर डिस्काऊंट देत आहे. (Airtel Prepaid Offers)

 

Airtel ने आपल्या अनेक प्रीपेड प्लान्सवर 50 रुपयांचे डिस्काऊंट देत आहे. मात्र, या डिस्काऊंटचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे Airtel Thanks अ‍ॅप असणे आवश्यक आहे. अ‍ॅपद्वारे प्लान सबस्क्राईब केल्यानंतर अ‍ॅडिशनल डेटा कूपन्स सुद्धा दिले जात आहेत.

 

एअरटेलच्या 359 रुपयांच्या बेसिक प्रीपेड प्लानमध्ये डेली 2GB डेटा दिला जातो. या प्लानसह अनलिमिटेड कॉल आणि रोज 100एसएमएसचा सुद्धा अ‍ॅक्सेस मिळतो. हा प्लान जेव्हा तुम्ही Airtel Thanks अ‍ॅपद्वारे रिचार्ज कराल तेव्हा यासाठी केवळ 309 रुपयेच खर्च करावे लागतील. (Airtel Prepaid Offers)

म्हणजे या प्लानवर कंपनी 50 रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. याशिवाय या प्लानसोबत अ‍ॅडिशनल 2GB डेटा दिला जातो. यास व्हॅलिडिटीदरम्यान कधीही रिडीम केले जाऊ शकते. कंपनी 599 रुपयांच्या प्रीपेड प्लानवर सुद्धा 50 रुपयांचे डिस्काऊंट देत आहे.

 

या प्लानसोबत Disney+ Hotstar Mobile चा सुद्धा अ‍ॅक्सेस मिळतो. यामध्ये डेली 3GB डेटासोबत अनलिमिटेड कॉल आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. हा प्लान तुम्ही डिस्काऊंट कूपनसोबत केवळ 549 रुपयात खरेदी करू शकता.

 

Airtel चा अगोदरपासून 549 रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. यामध्ये यूजर्सला डेली 2GB डेटाचा अ‍ॅक्सेस दिला जातो.
या प्लानची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे.
हा प्लान सुद्धा अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि रोज 100 SMS सोबत येतो. यासोबत कंपनी 4GB डेटा कूपन्स देत आहे.

 

Web Title :- Airtel Prepaid Offers | airtel is giving its daily data recharge plans at discount check details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

तीन दिवसानंतर जारी होईल PM Kisan योजनेचा 10वा हप्ता, जर नसेल यादीत नाव; ताबडतोब करा ‘हे’ काम

Pune Corona | चिंताजनक ! पुण्यातील कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 225 पेक्षा अधिक नवे रूग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून 5 कोटीच्या प्रकरणात खासगी सावकार नाना वाळके, अनिकेत हजारेला अटक

Pune Navale Bridge Accident | ‘पुण्यातील नवले पुलावरील अपघातांचे सत्र कधी थांबणार? शिवसेनेचे ‘NHAI’ कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन