Pune Corona | चिंताजनक ! पुण्यातील कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 225 पेक्षा अधिक नवे रूग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोना (Pune Corona) बाधित रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. आज (बुधवार) दुपारी चार वाजेपर्यंत शहरात 232 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 83 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. आज शहराबाहेरील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासात 6 हजार 600 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 232 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 38 लाख 52 हजार 009 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 5 लाख 9 हजार 508 जणांना कोरोनाची बाधा (Corona-infected patients) झाली आहे. त्यापैकी 4 लाख 99 हजार 175 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 1218 रुग्ण सक्रिय (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुणे शहरात रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. गेल्या 24 तासात शहराबाहेरील तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत पुणे शहरातील 9 हजार 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 90 रुग्ण गंभीर आहेत. तर 54 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona | Worrying ! Big increase in corona patients in Pune, more than 225 new patients in last 24 hours; Learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून 5 कोटीच्या प्रकरणात खासगी सावकार नाना वाळके, अनिकेत हजारेला अटक

Maharashtra Government Guidelines | थर्टी फस्टच्या पार्टी आणि कार्यक्रमांच्या पार्श्वभुमीवर राज्य गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

Maharashtra Police | मला आणि माझ्या कुटुंबाला देवेन भारतींपासून धोका; तक्रारदाराची पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी

Pune Navale Bridge Accident | ‘पुण्यातील नवले पुलावरील अपघातांचे सत्र कधी थांबणार? शिवसेनेचे ‘NHAI’ कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन

Earn Money | 5000 रुपये खर्च करून घरबसल्या कमवा लाखो रुपये महिना, ताबडतोब जाणून घ्या पद्धत