Airtel Recharge Plan | 3 जबरदस्त प्लान, खुप काही अनलिमिटेड आणि Free

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Airtel Recharge Plan | टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक प्लान बनवले आहेत. असे अनेक ग्राहक आहेत जे वारंवार रिचार्ज करण्याऐवजी दीर्घ व्हॅलिडिटीचा रिचार्ज निवडतात. तुम्हीही दीर्घ व्हॅलिडिटीचा रिचार्ज प्लान शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला दीर्घ व्हॅलिडिटीच्या रिचार्ज प्लानची माहिती देत आहोत. ज्यामध्ये ग्राहकांना अनेक फायदेही मिळत आहेत (Airtel Recharge Plan).

 

१. एअरटेलचा ४९९ रुपयांचा रिचार्ज प्लान
एअरटेलच्या ग्राहकांना या प्लानमध्ये मोठा फायदा मिळत आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ३ महिन्यांची व्हॅलिडिटी मिळत आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटा मिळत आहे. एवढेच नाही तर इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर एअरटेल थँक्स अ‍ॅपचा मोफत अ‍ॅक्सेस मिळत आहे आणि मोफत हॅलो ट्यून आणि विंक म्युझिकचा लाभही उपलब्ध आहे. डिस्ने हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन या प्लानच्या सर्व ग्राहकांना ३ महिन्यांसाठी दिले जात आहे. (Airtel Recharge Plan)

 

२. एअरटेलचा ६९९ रुपयांचा रिचार्ज प्लान
जर एअरटेलच्या या ६९९ रुपयांच्या प्लॅनच्या व्हॅलिडिटीबद्दल बोलायचे, तर ग्राहकांना या प्लानमध्ये ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे. या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग तसेच दररोज ३ जीबी डेटाचा लाभ मिळतो. एअरटेलचा हा ६९९ रुपयांचा प्लान ग्राहकांना दररोज १०० एसएमएस देत आहे. इतर फायद्यांबद्दल बोलयचे तर एअरटेल थँक्स अ‍ॅप आणि फ्री हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचे फायदे उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते.

३. एअरटेलचा ९९९ रुपयांचा प्लान
एअरटेलच्या ग्राहकांना या प्लानमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानमध्येही ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळतो.
यासोबतच दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. एअरटेलचा ९९९ रुपयांचा प्लान ग्राहकांना दररोज १०० एसएमएस देत आहे.
एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना एअरटेल थँक्स अ‍ॅप आणि फ्री हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचे इतर फायदेही मिळत आहेत,
तसेच अमेझॉन प्राइमचे मोफत सबस्क्रिप्शनही ग्राहकांना दिले जात आहे.

 

Web Title :- Airtel Recharge Plan | airtel 3 strong plans many unlimited and free

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune NCP | चंद्रकांत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याची ओळख पटली

Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीनंतर देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले… (व्हिडिओ)