‘Airtel’ च्या ग्राहकांना मोठा ‘झटका’, ‘ही’ फ्री सेवा होणार ‘बंद’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरटेलने आपल्या ग्राहकांची मोफत सेवा बंद करुन मोठा झटका दिला आहे. एअरटेल आता ग्राहकांना मोफत नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन देणार नाही. एअरटेल ब्रॉडबँड आणि काही पोस्टपेड प्लॅनसोबत मिळणारी ही सुविधा बंद केली आहे. सध्या वोडाफोन आणि एसीटी फायबरनेट कंपन्याही आता या सुविधा देत आहेत.

एअरटेलने ही माहिती वेबसाइटवर दिली आहे. जिओने आपल्या अनेक प्लॅनसह अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्ससारख्या अ‍ॅप्सचे मोफत सब्सक्रिपशन देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे एअरटेलनेही आपल्या ग्राहकांना पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लॅनसह तीन महिने नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन ऑफर केले होते. आता कंपनी सब्सक्रिप्शन व्हॅलिडिटी संपल्यावर फ्री सब्सक्रिप्शन बंद करणार आहे.

एअरटेल आपल्या पोस्टपेड प्लॅनसह अमेझॉन प्राईम, झी 5, Xstream चे सब्सक्रिप्शन देते. उदा. एअरटेलच्या 499 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये 75 जीबी इंटरनेट डाटा आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याशिवाय एका वर्षासाठी अमेझॉन प्राईम मेंबरशिप, झी 5, Xstream चे सब्सक्रिप्शन मिळते, याशिवाय हँडसेट प्रोटेक्शनही मिळते. परंतु यातील अमेझॉन प्राईमची फ्री सेवा कंपनी बंद करणार आहे.