Airtel कडून ग्राहकांना दरवाढीचा ‘शॉक’ ! स्वस्तातला ‘प्लॅन’ झाला ‘एकदम’ महाग, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय एअरटेलने पोस्टपेडच्या अ‍ॅड-ऑन कनेक्शनमध्ये (airtel postpaid ad on connection) बदल केले आहेत. एअरटेल आपल्या पोस्टपेड वापरकर्त्यांना महिन्याकाठी १९९ रुपये पासून अ‍ॅड-ऑन कनेक्शन देते, पण आता एअरटेलने ही किंमत वाढवून २४९ रुपये केली आहे. एअरटेलचे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन हटवल्यानंतर कंपनीने ग्राहकांना आणखी एक धक्का दिला आहे.

एअरटेलच्या पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी नियमित आणि डेटा अ‍ॅड-ऑन देण्यात येत आहेत आणि या योजना महिन्याकाठी 749 रुपयांपासून सुरू होतात. हि सर्व ग्राहकांसाठी नवीन किंमत या योजनेवर लागू केली आहे. दुसरीकडे डेटा अ‍ॅड-ऑन कोणताही बदल न करता दरमहा 99 रुपये किंमतीने सुरू होते. एअरटेलने केवळ नियमित अ‍ॅड-ऑन योजनांची किंमत बदलली आहे. ही किंमत दरमहा 249 रुपयांपासून सुरू होईल.

यासाठी महिन्यात येणार एवढे बिल
ज्या ग्राहकाकडे अ‍ॅड-ऑन कनेक्शन आहे, त्याला दरमहा 499 249 18% जीएसटी भरावा लागेल. आणि अ‍ॅड-ऑन कनेक्शनसाठी ग्राहकाला 18% जीएसटी देखील भरावी लागेल.

ब्रॉडब्रँडमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार नाही
याअगोदर एअरटेल ब्रॉडबँड योजनेसह नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी देत होते, पण आता हि योजना बंद केली आहे. आता एअरटेल ग्राहकांना एका वर्षासाठी अ‍ॅमेझॉन प्राइमची सदस्यता दिली जात आहे, ज्याची किंमत 999 रुपये आहे.

आर्थिक वर्षात टेलिकॉम कंपन्यांना हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. खरंतर एकेकाळी, देशातील वेगाने वाढणारा दूरसंचार उद्योग आता संकटात सापडला आहे. सोमवारी एअरटेलने १० हजार कोटी जमा केले. शुक्रवारपर्यंत 7 हजार कोटी रुपयांच्या रकमेपैकी निम्मी रक्कम देतील. व्होडाफोनने सर्वोच्च न्यायालयात असे सांगितले आहे. या कंपन्यांनी सरकारला थकित रक्कम परत करण्यासाठी सुरुवात केली आहे. देशाच्या टेलिकॉम कंपन्या आज रस्त्यावर येताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एजीआरवरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यास दिरंगाईबद्दल नाराज असल्याचं सांगितलं आहे.

एअरटेलने संचार मंत्रालयाला दिलेल्या पत्रात ही माहिती दिली. एअरटेल म्हणाले की, “24 ऑक्टोबर 2019 आणि 14 फेब्रुवारी 2020 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारती एअरटेल लिमिटेडने 9500 कोटी आणि भारती हेक्साकॉम लिमिटेडने 500 कोटी जमा केले आहेत. सोमवारी एअरटेलने एकूण 35,586 कोटी थकबाकीपैकी 10,000 कोटी रुपये जमा केले. सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी अगोदर एअरटेल परतफेड करेल.