‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘तानाजी : दी अनसंग वॉरियर’

सैफ अली खानही दिसणार 'या' भूमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता अजय देवगण याच्या ‘तानाजी : दी अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची रिलीज डेट फायनल झाली आहे. “आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं” असं म्हणत छत्रपती शिवरायांच्या एका शब्दावर कोंढाणा जिंकणारा स्वराज्याचा मावळा तानाजी मालुसरे यांचा हा बायोपिक आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. स्वतः अजय देवगण यांने याबाबत माहिती जाहीर केली आहे. अजय देवगण यामध्ये तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत असणार आहे.

यापूर्वीही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. २७ डिसेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आले होते. परंतु, ही तारीख बदलून आता चित्रपटाचे दिग्दर्शन दोन आठवडे पुढे ढकलण्यात आले आहे.

अभिनेता सैफ अली खान हादेखील या चित्रपटात दिसणार आहे. कोंढण्याचा किल्लेदार उदयभानसिंह यांची व्यक्तिरेखा सैफ अली खान साकारणार आहे. दिग्दर्शक ओम राऊत या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ओम राऊत यांनी याआधी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा बायोपिक लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दरम्यान, या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सलमान खान शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चाही सध्या सुरु असल्यचं दिसत आहे. परंतु, त्याला चित्रपटाच्या टीमने अद्याप दुजोरा दिलेला नाही असेही समजते आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like