‘ऑपरेशन ३७०’ नंतर ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ डोवाल यांचे शोपियामधील रस्त्यावर काश्मीरींसोबत ‘जेवण’ (व्हिडीओ)

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी काश्मीरमधील शोपीया या ठिकाणी भेट दिली. अजित डोवाल यांनी तेथील लोकांशी संवाद साधला. याबरोबरच अजित डोवाल काश्मिरी लोकांसोबत जेवण करताना दिसून आले. जम्मू काश्मीरमधील तणावपूर्ण परिस्थिती कमी करण्यासाठी अजित डोवाल प्रयत्न करत असल्याचे यावरून दिसत आहे.

अजित डोवाल जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकल्यानंतर काश्मीर दौर्‍यावर आहेत. त्यांनी जम्मू काश्मीरमधील विविध भागात सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. काश्मीरमधील सामान्य लोकांसोबत त्यांनी जेवण घेतले. डोवाल यांनी तेथील पोलिस अधिकाऱ्यांच्याही भेट घेतली. त्यांच्यासमवेत जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंहही उपस्थित होते.

पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर अजित डोवाल यांनी सुरक्षा दलाच्या जवानांनाही भेट दिली आणि सुरक्षेची परिस्थिती जाणून घेतली. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर अजित डोवाल यांची अशी ही पहिलीच भेट आहे. डोवाल यांच्या मंगळवारी भेट देण्यापूर्वी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि संबंधित जिल्ह्यातील पोलिस आयुक्तांना आपआपल्या भागातील लोकांना पूर्ण मदत देण्याचे निर्देश दिले.

यापूर्वी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीत निवासस्थानी कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी अफेयर्स (सीसीएस)ची सुमारे एक तासासाठी बैठक झाली. ज्यात जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उच्चस्तरीय बैठकीस उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त