Ajit Pawar | ‘…म्हणून मी नॉट रिचेबल होतो’, अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रसेचे (NCP) नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे शुक्रवारी (दि.7) नॉट रिचेबल (Not Reachable) झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आज (शनिवार) नेहमीप्रमाणे अजित पवार सकाळपासून त्यांच्या नियोजित दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील खराडी येथील एका ज्वेलर्सच्या उद्घाटनासाठी अजित पवार (Ajit Pawar) आले होते. यावेळी त्यांनी नॉट रिचेबल असल्याच्या वृत्ताचे खंडण केलं. तसेच नॉट रिचेबल राहण्याचं कारण देखील त्यांनी सांगितलं.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी माणूस आहे आणि क्रार्यक्रमाला निघताना पित्ताचा त्रास व्हायला लागला. जागरण जास्त झालं. दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. हे काही आजचं नाही, तर याआधीही असं झालं आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या घेतल्या आणि शांत झोपलो. आज सकाळपासून कार्यक्रमला सुरुवात केली आहे. माझ्याविषयी चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे व्यथित झालो आहे. माध्यमांनी विनाकारण बदनामी करणं थांबवावे, खात्री करुनच यापुढे बातम्या द्याव्यात, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

 

एखाद्याची किती बदनामी करायची

अजित पवार म्हणाले, मी काल पुण्यात होतो, दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरु होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून माझे महाराष्ट्रभर दौरे (Maharashtra Tour) होते. या दौऱ्यात प्रचंड दगदग झाली, विश्रांती मिळाली नाही, झोपही पूर्ण होत नव्हती. त्याचा परिणाम माझ्या प्रकृतीवर झाला, पित्त वाढले. त्यामुळे काल दुपारी अचानक अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेत औषधे घेऊन पुण्यातल्या ‘जिजाई’ या निवासस्थानी विश्रांती घेतली.

मात्र या काळात मी नॉट रिचेबल असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी चालवल्या.
कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही लिमीट असते.
माध्यमातील माझ्याविषयी आलेल्या बातम्या पाहून मी व्यथित झाले.
आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्याविषयी बातम्या करण्याचा अधिकार माध्यमांना आहे.
परंतु कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालवणं हे चुकीचं आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar says he was feeling not well thats why not reachable

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | मोक्काच्या गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

CNG-PNG Rates Reduces | पुणेकरांना दिलासा! सीएनजी 6 रुपयांनी तर पीएनजीच्या किंमती 5.70 रुपयांनी स्वस्त

Maharashtra Politics News | ‘या माणसाने महाराष्ट्राच्या राजकारणात दुहीचं बीज पेरलं’, चंद्रकांत पाटलांचा निशाणा कोणावर?