Pune Crime News | मोक्काच्या गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मोक्काची कारवाई (MCOCA) Mokka झाल्यानंतर फरार झालेल्या आरोपीच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकनने (Anti Extortion Cell) मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी दोन वर्षांपासून फरार होता. ही कारवाई गुरुवारी (दि.6) शिवाजीनगर (Shivajinagar) येथील पाटील इस्टेट जवळील ब्रिजखाली केली. (Pune Crime News)

 

ओंकारसिंग करतासिंग टाक (वय-29 रा. तुळजा भवानी वसाहत, हडपसर,) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकाला मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी पाटील इस्टेट (Patil Estate) जवळील ब्रिजखाली उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने जागेच्या वादातून रवि धोत्रे याला भावाच्या मदतीने तलवारीने मारल्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपीवर 2021 मध्ये गुन्हा (FIR)दाखल करण्यात आला होता. पुढील कारवाईसाठी आरोपीला हडपसर पोलिसांच्या (Hadapsar Police Station) ताब्यात दिले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare),
सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Accused absconding for two years in Mokka crime arrested by Crime Branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करु नयेत, त्याची सुरुवात चंद्रकांत पाटलांनी स्वत: पासून करावी’, अजित पवारांचा टोला (व्हिडिओ)

Pune Crime News | आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या बुकीला गुन्हे शाखेकडून अटक; पुण्यातील इतर बुकी पोलिसांच्या ‘रडार’वर

Pune Political News | खा. अमोल कोल्हे भाजपात आले तर आढळरावांचं काय? चंद्रकांत पाटलांचं सुचक विधान