Ajit Pawar | ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच, ‘आदित्य’ हा शब्द मागे घेतो’ – अजित पवारांचं स्पष्टीकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | पुण्यात वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यावेळी मागे लावलेले निर्बंधच कायम राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला आहे. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी चर्चांना अखेर फुलस्टाॅप दिला आहे.

 

”राज्यात कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता दिवसा जमावबंदी आणि रात्री नाईट कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ऑक्सिजनची मागणी वाढली तर त्याबद्दलचे निर्णय ”मुख्यमंत्री या नात्यानं आदित्य ठाकरे साहेब” घेतील..असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं होतं. बोलताना आदित्य ठाकरे यांचाच मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने सोशल मिडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली होती.

 

दरम्यान यानंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली की, “मी आदित्य हा शब्द मागे घेतो आणि त्याठिकाणी उद्धवजी हा शब्द देतो. आमच्यात असा कोणताही गैरसमज नाही. आमचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar withdrawal his word Aditya and said uddhav thackeray is cm of maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Post Office Scheme | ‘पोस्ट ऑफिस’ची सर्वात जास्त फायदा देणारी योजना! केवळ 5 वर्षांच्या गुंतवणुकीत मिळतील 14 लाखांपेक्षा जास्त

 

PF Balance | पीएफ बॅलन्स चेक करणे खुपच सोपे, मिस्ड कॉलने सुद्धा मिळू शकते माहिती; जाणून घ्या

 

Restrictions In Pune | कोरोनाचे निर्बंध वाढणार का? पुण्यातील आढावा बैठकीनंतर अजित पवार म्हणाले… (व्हिडीओ)