Ajit Pawar | ‘माझ्या सासुरवाडीचं फार प्रेम उतू चाललंय’, ‘भावी मुख्यमंत्र्या’च्या बॅनरवरुन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मिश्किल अंदाजात सुनावलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावरुन राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच राष्ट्रवादीच्या (NCP) अति उत्साही कार्यकर्त्यांनी धाराशिव मधल्या तेर गावात राज्याचे भावी मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अशा आशयाचे बॅनर्स लावले होते. बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी मिश्किल अंदाजात सुनावलं आहे.

सासूरवाडीचं फार प्रेम उतू चाललंय

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, माझ्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावू नयेत. आमच्या कर्यकर्त्यांनी अतिशय चुकीची अपेक्षा मनात ठेवून हे बॅनर लावले आहेत. मात्र मुख्यमंत्री (CM) होण्यासाठी 145 ची मॅजिक फिगर त्या नेत्याकडे असावी लागते. त्याचवेळी तो नेता मुख्यमंत्री होतो. माझ्या सासुरवाडीचं फार प्रेम उतू चाललंय, पण सध्या आमच्याकडे मॅजिक फिगर नाही, असं मिश्किल अंदाजात सांगताना अजित पवारांनी उत्साही कार्यकर्त्यांना सुनावलं.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील वाटलं नव्हतं

बॅनर लावून कुणी मुख्यमंत्री होत नसतं. ज्याला मुख्यमंत्री व्हायचंय त्याच्याकडे बहुमताचा आकडाच लागतो.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) होतील, असं कुणालाच वाटलं नव्हतं.
पण त्यांनी विविध क्लुत्या, आयडिया वापरुन भाजपच्या (BJP) साथीने खुर्ची मिळवली. ते मुख्यमंत्री होतील, असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण बहुमताचा आकडा असल्याने ते मुख्यमंत्री झाले. माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मी विशेष आवाहन करतो, की आशा प्रकराचे बॅनर लावू नयेत असे आवाहन अजित पवार यांनी केले.

तेव्हा अशी पदं मिळतात

सहकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि सासुरवाडीच्या लोकांचा बॅनरच्या माध्यमातून चुकीचा ग्रह आहे.
तुम्ही जास्त काम करा. आपल्या विचारांचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणा.
तेव्हा अशी पदं मिळतात त्यालाही वरिष्ठांचा आशीर्वाद हवा, असं अजित पवारांनी हसत सांगितलं.

Web Title :-  ajit pawar comment on banners projecting future maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Prisons Department News | राज्य कारागृह विभागातील 49 अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर ! अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची घोषणा

Pune BJP Jagdish Mulik On Congress Mallikarjun Kharge | भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांचे काँग्रेसवर शरसंधान; म्हणाले – ‘गांधी कुटुंबाचे पोपट बोलू लागले’