Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथील ‘वानवडी जनरल हॉस्पिटल’चे लोकार्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शुभहस्ते आज वानवडी येथील शंभर बेडच्या सुसज्ज अशा ‘वानवडी जनरल हॉस्पिटल’चा (Wanwadi General Hospital) लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 100 बेडची क्षमता (100 Beds Capacity) असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये अद्यावत सोयी-सुविधांसह नागरिकांच्या सेवेत उपलब्ध असणार आहेत. या हॉस्पिटलच्या माध्यमातून वानवडी (Wanwadi), हडपसर (Hadapsar) तसेच पुणे शहरातील (Pune City) नागरिकांना आरोग्यविषयक उत्तम सुविधा मिळतील, असे मत अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले.

 

 

तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (Maharashtra State Reserve Police Force) गट क्रमांक 1 येथील बॅडमिंटन कोर्टच्या इनडोर स्टेडियमचा (Badminton Court’s Indoor Stadium) शुभारंभ अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आला. प्रशांत जगताप (Prashant Jagtap) व रत्नप्रभा जगताप (Ratnaprabha Jagtap) हे सातत्याने 20007 पासून एस.आर.पी.एफ (S.R.P.F.) मधील पायाभूत सुविधांवर काम करत असून राज्यभर आपत्कालीन परिस्थिती सण-उत्सव अशा सर्व परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांची काळजी घेतात याचा मला निश्चित अभिमान आहे, एस. आर.पी.एफ साठी इथून पुढच्या काळात देखील कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.

 

 

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe),
ज्येष्ठ नेते अंकुश काकडे (Ankush Kakade), नगरसेविका रत्नप्रभा जगताप (Corporator Ratnaprabha Jagtap),
नंदा लोणकर (Corporator Nanda Lonakar), अश्विनी कदम (Corporator Ashwini Kadam),
नगरसेवक आनंद अलकुंटे (Corporator Anand Alkunte), मोहसिन शेख (Mohsin Sheikh) आदी उपस्थित होते.

 

 

 

Web Title :- Ajit Pawar | Dedication of Wanwadi General Hospital at Wanwadi by Deputy Chief Minister Ajit Pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nandurbar Police | मुलाने महिलेला पळवल्याच्या रागातून वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, 5 आरोपींना नंदुरबार पोलिसांनी केली अटक

 

Tandul Mahotsav Pune 2022 | अजित पवार यांच्याहस्ते तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन ! उपमुख्यमंत्र्यांचे शेतकर्‍यांना आवाहन, म्हणाले – ‘शेतमालाचे उच्च दर्जाचे अधिक उत्पादन काढा’

 

Sooji Roti Recipe | डायबिटीज कमी ठेवण्यासह शरीरात एनर्जी राखते ‘सूजी’, अशी तयार करा सूजीची चपाती