Ajit Pawar | लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात पहिला, कठोर निर्णय घेण्याची वेळ आली; अजित पवारांनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – जगातील लोकसंख्येच्याबाबत संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडचा (United Nations Population Fund (UNFPA) अहवाल नुकताच समोर आला आहे. यात चीनला (China) मागे टाकून भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनला. भारताची लोकसंख्या 142.86 कोटी, तर चीनची 142.57 कोटी असल्याची घोषणा संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्याविषयक विभागाने केली. त्याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक विधान केलं आहे. तसेच लोकसंख्या वाढीवर चिंता व्यक्त करत तीन आपत्ये असणाऱ्या आमदार-खासदारांना अपात्र (MLA-MP Disqualified) करण्याची मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्राकडे केली आहे. ते रविवारी बारामतीत बोलत होते.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री (CM Vilasrao Deshmukh) असताना आम्ही घाबरत घाबरत तिसरे अपत्य (Third Child) झाल्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास अशांना अपात्र केले. सहकार क्षेत्रामध्ये देखील अशा लोकांना अपात्र (Disqualify) केले. त्यावेळी लोक आम्हाला म्हणायचे खासदार (MP) आमदारांना (MLA) हा नियम नाही का. मात्र हा अधिकार आमच्या हातात नसून तो केंद्राच्या (Central Government) हातात आहे. केंद्राने याबाबतचा निर्णय घ्याव अशी मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं असते ते बरोबर दोन अपत्यांवर थांबतात. तिसऱ्या अपत्याबाबत निर्णय घेताना आम्ही मार्ग काढला. पहिल्या बाळंतपणात एक अपत्य झाले आणि दुसऱ्यावेळी जुळे (Twins) जन्माला आले, तरी यामध्ये आई-वडिलांचा दोष नाही. हा विषय मी कॅबिनेट मीटिंगमध्ये (Cabinet Meeting) मांडला होता. दुसऱ्या वेळेस जुळे, तिळे झाले तर तिथेच थांबायचे. तसेच पहिल्या बाळंतपणा (Childbirth) वेळेस जर जुळे आणि तिळे झाले तर मात्र दुसरे बाळंतपण होऊ द्यायचं नाही. पहिल्या बाळंतपणा वेळेसच थांबायचं, असं अजित पवारांनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अजित पवार यांनी लोकसंख्येवरुन टोलेबाजी केली होती.
जगात सर्वात जास्त लोकसंख्या आपल्या देशात झाली आहे.
त्यामुळे आता अतिशय कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
संतती प्राप्ती ही काही देवाची कृपा नाही, तर ही नवरा बायकोची कृपा आहे.
हे कृपया आपण सर्वांनी आता तरी मान्य केलं पाहिजे, असे अजित पवार म्हणाले होते.

लोकसंख्या वाढीमुळे आपल्याला अनेक प्रश्नांना रोज सामोरं जावं लगतं.
जगातील सर्वात तरुणांची संख्या आसलेला देश आपण आहोत. पण, भविष्याचा विचार केला पाहिजे.
पुढच्या पीढीचं नुकसान होणार नाही, याचं चिंतन केलं पाहिजे आणि कठोर निर्णय घेतला पाहिजे,
असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं.

Web Title :- Ajit Pawar | disqualify mps and mlas who have 3 kids says ajit pawar in baramati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Cyber Crime News | पुण्यातील पोलिसाने 5 भाषेतून आदरयुक्त ‘आदेश’ देवून हस्तगत केले 9 राज्यातून 51 हरवलेले मोबाईल

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंकडून मोदींचा एकेरी उल्लेख, बावनकुळे संतापले, म्हणाले- ‘बोलताना जरा तारतम्य बाळगा’ (व्हिडिओ)

CM Eknath Shinde | ‘झोळी लटकवून निघून जाशील…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… (व्हिडिओ)