Ajit pawar Group On Supriya Sule | अजित पवार गटाकडून पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र; थेट सवाल, ‘याची जबाबदारी कोण घेणार?’

पोलीसनामा ऑनलाइन – Ajit pawar Group On Supriya Sule | अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह आणि गट निर्माण झाले आहेत. अजित पवारांनी आपली वेगळी चुल मांडण्याचा निर्धार केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राष्ट्रवादीमधील हे दोन्ही गट आता एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, यावेळी पहिल्यांदाच अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ((Ajit pawar Group On Supriya Sule)

सुप्रिया सुळे या उत्तम संसदपटू आहेत. त्यांना दरवर्षी संसदरत्न पुरस्कार मिळतो. त्यांच्या भोवती शरद पवार (Sharad Pawar) नावाचे वलय आहे. याचा वापर करुन पक्ष किमान दिल्लीमध्ये तरी वाढवायला हवा होता. वर्षातील 180 दिवस खासदार म्हणून तुम्ही दिल्लीमध्ये होता. मग आजपर्यंत दिल्लीमध्ये साधा 1 नगरसेवक निवडणून आणता आला नाही. अशी बोचरी टीका अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी सुप्रिया सुळेंवर केली आहे. (Ajit pawar Group On Supriya Sule)

अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी आज राष्ट्रवादीच्या शरद पवार समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केला. खा. सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार यांच्यावर कसा अन्याय झाला आहे याचा पाढा वाचून दाखवला. उमेश पाटील म्हणाले की, “राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही सांगायचे. राष्ट्रीय पातळीवर कुठेतरी मिझारोम, त्रिपुरा इथं त्यांच्या पातळीवर खासदार पक्षाचे चिन्ह घेऊन निवडून येणार, केरळमध्ये 2-2 आमदार येणार. गोव्यामध्ये तर पक्ष संपूनच गेला आहे.

महाराष्ट्रात हेलपाटे मारत बसण्यापेक्षा देशभर फिरून पक्ष वाढवला असता तर आज पक्ष खूप मोठा झाला असता. माझे पक्षावर प्रेम आहे म्हणून मला वाटते. ज्यांचे व्यक्तिमत्व राष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्ह आहे, शरद पवार नावाचा पाठिंबा आहे. इतके असूनही देशभरात पक्ष वाढू शकला नाही त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Ajit pawar Group On Supriya Sule)

प्रवक्ते उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रीय स्तरावर काम करण्यास कमी पडत असल्याचे सांगितले आणि अंतर्गत राजकारणामुळे ही आजची वेळ आली आहे असे परखडपणे सांगितले आहे. ते म्हणाले की, “गोवा, गुजरात, मिझारोम, नागालँड, बिहार याठिकाणी अजित पवारांनी जाऊन पक्ष वाढवायचा का? अजित पवार एकटे राज्य सांभाळायला सक्षम होते, परंतु अजित पवारांनी कष्ट केल्यानंतर यांना डोके लावायचे होते म्हणून आज ही वेळ आलीय. आम आदमी पक्ष 2 राज्यात सत्ता मिळवतो. संपूर्ण महाराष्ट्र आज पक्ष व्यापलेला नाही.

देशाचे पंतप्रधानपदासाठी असलेले व्यक्तिमत्व असलेले शरद पवार, सुप्रियाच्या कर्तृत्वावर विश्वास आहे.
परंतु देशभरात पक्ष वाढवला नाही. अजित पवारांची कोंडी करायची आणि अडचण करायची आणि विनाकारण आपापले फोलोअर्स वाढवले, अजित पवारांनी महाराष्ट्र बघितला असता तर ही अडचण आली नसती” अशा शब्दांत उमेश पाटील यांनी घणाघात केला आहे.

पुढे त्यांनी अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादीमध्ये कसा अन्याय झाला आहे हे पाटलांनी बोलून दाखवले.
उमेश पाटील म्हणाले की, “अजित पवारांवर मला प्रदेशाध्यक्ष करा अशी बोलण्याची वेळ यावी,
इतके त्यांचे व्यक्तिमत्व छोटे झाले का? त्यावर एकही बोलले नाहीत हे असं चालत नसतं.
प्रफुल पटेल शरद पवारांची सावली म्हणून काम केले. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनी ही भूमिका घेतली,
ज्यांनी 40 वर्षे तुमच्यासोबत काम केले.

हे लोक विरोधात राहिले नव्हते का? आत्ताच हा निर्णय घ्यायची वेळ का आली.
कुवत नसलेल्या माणसाच्या हातात पक्षाची सूत्रे द्यायचा प्रयत्न झाला तर पक्ष बुडणार हे निश्चित होते.
त्यामुळे पक्ष चाचवण्यासाठी अजित पवारांनी जबाबदारी घेतली अशा स्पष्ट शब्दांमध्ये उमेश पाटील यांनी
मत मांडले असून सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात मोबाईलवर चर्चा, रात्री उशीरा मंत्री सामंतांनी घेतली भेट

13 September Rashifal : कन्या, तुळ आणि कुंभ राशीला नोकरीसाठी चांगला दिवस, वाचा दैनिक भविष्य

Yashomati Thakur On Navneet Ravi Rana | ‘औकातीत रहायच, माझ्या बापाने आणि आम्ही…’
नवनीत राणांच्या आरोपांवर यशोमती ठाकूर भडकल्या