Ajit Pawar | ‘या’ मुद्यावरून अजित पवार भडकले; म्हणाले – ‘आपणच नियम करायचे आणि आपणच तोडायचे हे आमच्या रक्तात नाही’

बारामती न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडी येथे (शुक्रवारी) सकाळी बैलगाडी शर्यत पार पडली. या मुद्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केले आहे. ‘काही जण बैलगाडी (Bullock cart) शर्यतीवरून स्टंटबाजी करत आहेत. मागील 5 वर्षाच्या काळात त्यांचेच सरकार होते. केंद्रात देखील त्यांचीच सत्ता होती. कोणी त्यांना अडवल नव्हतं. निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरूय. या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी काही करत नाही असे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न काहींचा सुरू आहे. कायदा तोडून कोणी स्पर्धा भरवत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार. असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यावेळी सांगितलं आहे.

पुढे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ‘आम्हाला सुद्धा स्पर्धा घेता येतात.
मात्र आपणच नियम करायचे आणि आपणच तोडायचे हे आमच्या रक्तात नाही.
असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी अजित पवार हे बारामती (Baramati)
येथे आज (शनिवारी) कोरोना आढावा बैठकीनंतर मीडियाशी बोलत होते.
‘बैलगाडी शर्यत सुरू व्हावी अशीच राज्य सरकारची भूमिका आहे.
परंतु, सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार बैलगाडी शर्यतीवर बंदी आहे.
राज्य शासनापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार मोठा आहे.
त्यामुळे त्या निर्णयाचे पालन राज्य शासनाला (State Government) करावे लागते.
बैैल हा प्राणी पाळिव प्राणी न गणला जाता वन्यप्राणी म्हणून गणला गेला.
हा केंद्र सरकाच्या अखत्यारीतला विषय आहे, असं देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

 

काय आहे प्रकरण?

सांगली (Sangli) येथील आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडी येथे शुक्रवारी सकाळी बैलगाडी शर्यत पार पडली. सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकरांसह (MLA Gopichand Padalkar) 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील 4 दिवसांपासून चर्चेत असलेली झरे येथील बैलगाडा शर्यत शेवटी पहाटे पार पडली.
शर्यतीचे आयोजन होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आटपाडी तालुक्यात संचारबंदी
जाहीर केली होती. तेथील झरे गावासह आसपासच्या 9 गावात नाकाबंदी लावली होती.
पोलिसांनी आमदार पडळकरांसह (MLA Gopichand Padalkar) आयोजनात सहभागी
असलेल्या झरे गावातील ग्रामस्थांना नोटिसा पाठवल्या होत्या.
परंतु, यानंतरही शुक्रवारी पहाटे पोलिसांना चकवा देत बैलगाडी शर्यत पार पडली.
मात्र, त्यादिवशी संध्याकाळी आटपाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title : Ajit Pawar | it not our blood make rules and break them ourselves said deputy chief minister ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Hurun Global 500 | जगातील 500 सर्वात मूल्यवान कंपन्यांमध्ये 12 भारतातील; रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव सर्वात वर

Pune Crime | विवाहितेला दिली मुलाला उचलुन नेण्याची धमकी, 6 जणांवर FIR

Pune Crime | पुण्यातील हडपसर परिसरात प्रेमसंबंधातून 22 वर्षीय तरूणीची आत्महत्या, प्रियकराला अटक