Ajit Pawar | ‘केतकी चितळेला चांगल्या मनोरूग्णालयात दाखविण्याची गरज’ – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केतकीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तिला ठाणे पोलिसांनी (Thane Police) ताब्यात घेतले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीही केतकीच्या पोस्टचा निषेध केला असून आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही केतकीच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

”केतकीला चांगल्या मनोरूग्णालयात दाखविण्याची गरज असल्याचं,” अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. ”महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारावर चालतो. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला चांगल्या संस्काराचा वारसा घालून दिला आहे. इतक्या खालच्या पातळीवरील टीका महाराष्ट्रात खपवून घेतली जात नाही.” असं अजित पवार म्हणाले.

 

केतकी चितळेला घेतलं ताब्यात…

केतकी चितळेवर राज्यातील विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिका केल्याप्रकरणी अखेर ठाणे पोलिसांनी (Thane Police) केतकीला ताब्यात घेतले आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | ketki chitale needs to be shown in psychiatric hospital says ncp leader and dcm ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा