Ajit Pawar Letter To Amit Shah | आता अजित पवारांचे अमित शहांना पत्र, केंद्राच्या ‘या’ निर्णयावर नाराज?

मुंबई : Ajit Pawar Letter To Amit Shah | केंद्र सरकारने (Central Govt) उसापासून होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर (Ethanol Production Ban) बंदीचा निर्णय घेतल्याने साखर कारखानदारांसमोर (Sugar Factory) नवे संकट उभे राहिले आहे. याचा परिणाम सहाजिकच ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर देखील होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराज असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अजित पवार यांनी याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना पत्र (Ajit Pawar Letter To Amit Shah) पाठवले आहे. या पत्रात त्यांनी इथेनॉल निर्मितीबाबत घेतलेला निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.

अजित पवार यांनी या पत्रात अमित शाह यांना विनंती केली आहे की, केंद्र सरकारकडून इथेनॉलबाबत घेण्यात आलेला निर्णय ग्राहक आणि अन्नपुरवठा विभागाच्या दृष्टीने योग्य असला तरी उसाच्या उद्योगात हजारो शेतकरी गुंतलेले आहेत.
त्यामुळे या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा. (Ajit Pawar Letter To Amit Shah)

पत्रात पुढे म्हटले आहे की, उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी घातल्यास हा उद्योग अडचणीत येईल.
इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा उद्योग अडचणीत आल्यास कारखान्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे आपण निर्णयाचा पुनर्विचार करावा.

दरम्यान, इथेनॉल निर्मितीवरील बंदीच्या निर्णयासंदर्भात अजित पवार हे अमित शाह यांच्या भेटीसाठी जाण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | ‘…पटेलांना विनंती करणार ‘मिरची कम’ जेवण द्या,’ उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला जोरदार टोला

सोमवंशी क्षेत्रीय समाज संस्थेची आर्थिक फसवणूक, युको बँकेच्या अधिकाऱ्यांवर FIR

गाणी बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, तीन तरुणांवर गुन्हा दाखल; विनाननगर परिसरातील घटना

Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंबाबत फडणवीस यांचा मोठा दावा, ”त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय माझाच…”