Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंबाबत फडणवीस यांचा मोठा दावा, ”त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय माझाच…”

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) राज्याचे मुख्यमंत्री झाले, मात्र सर्वाधिक आमदार असताना देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री झाले. यावेळी घडलेल्या घडामोडींवर अजूनही विविध प्रकारची चर्चा सुरू आहे. या चर्चांना पूर्णविराम देताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय माझा होता, असे त्यांनी म्हटले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री पदावरून विरोधकांनी खिल्ली उडवली होती, याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, असे आरोप झाले की माझे मनोरंजन होते. मी वारंवार हे सांगितले आहे. एक तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय माझा होता. हा पक्षाच्या वरिष्ठांचा निर्णय नाही. मी प्रस्ताव मांडला होता. वरिष्ठांनी तो मान्य केला. मी मुख्यंमत्री होणार नाही हे मला आधीपासून माहिती होते. पण मी उपमुख्यमंत्री होईन हे शेवटच्या दिवसापर्यंत माहिती नव्हते. पक्षाने सांगितले की सरकार चालवायचे आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. हा माझा सन्मान आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्या पक्षाने उद्या मला सांगितले की तुमचे काम संपले, आता तुम्ही घरी बसा, तर मी घरी बसेन. कारण मी जे काही आहे, ते माझ्या पक्षामुळे आहे. माझ्या नावामागचे भाजपा काढून टाकले तर मी शून्य आहे. त्यामुळे पक्ष जे सांगेल, ते मी करेन.

दिल्लीत जाण्याच्या चर्चेबाबत फडणवीस म्हणाले, पक्षाला जेव्हा वाटेल, तेव्हा मला बोलवतील.
पण बाकी ज्यांना वाटते की बला टळली पाहिजे, त्यांना मी सांगेन, तुम्ही देव पाण्यात ठेवून बसलात, तरी बला काही टळत नाही.

घसरलेले राजकारण आणि खालच्या पातळीची टीका यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या
वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, हा साथीचा रोग आहे. हा करोनासारखाच आहे.
तो मूळ विषाणू कुठे आहे हे सगळ्यांना माहिती आहे. रोज सकाळी हा विषाणू पसरवण्याचे काम माध्यमांकडून केले जाते.
आमचे अँटिव्हायरसचे काम चालू आहे. लोक कंटाळलेच आहेत. एक दिवस लोक त्यांना पाहणेच बंद करतील.
मग तेव्हा माध्यमंही त्यांना दाखवणे बंद करतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | मनपा आयुक्तांनी विना दबाव अतिक्रमण कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, संदीप खर्डेकर यांची मागणी

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला तलाठ्यासह मदतनीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Accident News | एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात, पाच विद्यार्थी गंभीर जखमी; चांदणी चौकातील घटना

Pune Police MCOCA Action | तरुणाचे अपहरण अन् बेदम मारहाण, तरुणाचा चेहरा विद्रुप करणाऱ्या निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 96 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

ACB Trap News | कोर्टातील क्लार्कसाठी 50 हजार मागितले, 20 हजार लाच स्वीकारताना वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात