Pune Crime News | गाणी बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, तीन तरुणांवर गुन्हा दाखल; विनाननगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रात्रीच्या वेळी रस्त्यामध्ये कार उभी करुन जोरात गाणी वाजवणाऱ्या तरुणांना आवाज बंद करण्यास सांगितला. याचा राग आल्याने तीन तरुणांनी महिलेला मारहाण करुन विनयभंग (Molestation) केला. तसेच महिलेच्या आईला शिवीगाळ करुन त्यांना देखील मारहाण (Beating) केली. हा प्रकार विमाननगर येथील निको गार्डनच्या पाठीमागे रविवारी (दि.10) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी तीन तरुणांवर विमानतळ पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) सोमवारी (दि.11) फिर्याद दिली आहे. यावरुन आशुतोष विजय साबळे (वय-25), आदित्य विजय साबळे (वय-27), आशिष विजय साबळे (वय-23 सर्व रा. गंगापुरम सोसायटी, विमाननगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 354, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांचे घरातील झोपले असताना आरोपी हे स्विफ्ट कारमध्ये (एमएच 12 एन.जी. 7747) जोरात गाणी लावून थांबले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना हटकले. त्यांना गाण्याचा आवाज बंद करण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी उद्धटपणे उत्तर दिले. फिर्यादी या आरोपींना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आसताना त्यांनी हाताने मारहाण केली. तसेच त्यांचा ड्रेस पकडून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले.

दरम्यान, फिर्यादी यांच्या आई मध्ये आल्या असता त्यांना देखील शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी माराहण केली. या मारहाणीमध्ये फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र कोठेतरी पडून गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.के. पोटे (API S.K. Pote) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | मनपा आयुक्तांनी विना दबाव अतिक्रमण कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, संदीप खर्डेकर यांची मागणी

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला तलाठ्यासह मदतनीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Accident News | एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात, पाच विद्यार्थी गंभीर जखमी; चांदणी चौकातील घटना

Pune Police MCOCA Action | तरुणाचे अपहरण अन् बेदम मारहाण, तरुणाचा चेहरा विद्रुप करणाऱ्या निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 96 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

ACB Trap News | कोर्टातील क्लार्कसाठी 50 हजार मागितले, 20 हजार लाच स्वीकारताना वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात