Pune Crime News | सोमवंशी क्षेत्रीय समाज संस्थेची आर्थिक फसवणूक, युको बँकेच्या अधिकाऱ्यांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील सोमवंशी क्षत्रिय समाज ट्रस्ट (Somvanshi Kshatriya Samaj Trust, Pune) या संस्थेचे गोठविलेले बँक खाते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या परवानगिशिवाय परस्पर सरु करुन त्यातील रक्कम काढून घेत आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली. याप्रकरणी युको बँकेचे (UCO Bank) मॅनेजर, दोन असिस्टंट मॅनेजर यांच्यासह सहा जणांवर खडक पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 11 जुलै 2022 ते 16 जुलै 2022 या कालावधीत युको बँकेच्या रविवार पेठ शाखेत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत मनोज गुरुनाथ आरसिद्ध (वय-49 रा. गुरुवार पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून बँक मॅनेजर (Bank Manager) सैफ मोहम्मद अश्रफ (वय-35 मूळ रा. वाराणसी, उत्तर प्रदेश, सध्या रा.कोंढवा), असिस्टंट मॅनेजर शिवानी विनायक, असिस्टंट मॅनेजर अर्चना अग्रवाल, अनिल नारायण वाळवेकर (रा. गंजपेठ), विनेश प्रकाश झाड (रा. गुरुवार पेठ), मनोज मनोहर काटवे, (रा. वंडर सिटी, कात्रज) आणि मोनाली मनीष खेरुड (रा. श्रद्धा टेरेस, गुलटेकडी) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवंशी क्षत्रिय ट्रस्टचे काम पाहतात.
या संस्थेचे युको बँकेच्या रविवार पेठे शाखेत खाते आहे. या खात्यामध्ये 60 हजार रुपये जमा होते.
हे खाते गोठवण्यात आले होते. आरोपींनी फिर्यादी मनोज आरसिद्ध यांच्या परस्पर संस्थेची परवानगी न घेता
स्वत:ची केवायसी कागदपत्रे बँकेला दिली. फिर्यादी यांच्या अपरोक्ष बँक खाते चालू करुन पैसे काढून घेतले.

सैद मोहम्मद, शिवानी विनायक, अर्चना अग्रवाल आणि समाज बांधव असलेले अनिल वाळवेकर, विनेश झाड, मनोज काटवे,
मोनाली खेरूड या सर्वांनी मिळून ही रक्कम काढून घेत त्याचा अपहर करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याबाबत फिर्यादी यांनी तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी सोमवारी सात जणांविरुद्ध
गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग (PSI Rahul Jog) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | मनपा आयुक्तांनी विना दबाव अतिक्रमण कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, संदीप खर्डेकर यांची मागणी

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला तलाठ्यासह मदतनीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Accident News | एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात, पाच विद्यार्थी गंभीर जखमी; चांदणी चौकातील घटना

Pune Police MCOCA Action | तरुणाचे अपहरण अन् बेदम मारहाण, तरुणाचा चेहरा विद्रुप करणाऱ्या निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 96 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

ACB Trap News | कोर्टातील क्लार्कसाठी 50 हजार मागितले, 20 हजार लाच स्वीकारताना वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात