Ajit Pawar | परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी RTPCR बंधनकारक; शाळांबाबतही अजित पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omycron variant) सर्व जगाला चिंता लागलेली आहे. या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने (Central Government) खबरदारी म्हणून सर्व राज्यांना सुचना दिल्या होत्या. दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकार (Maharashtra Government) यांच्या नियमात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठीच्या निर्बंधामध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीतील तफावत दूर केली असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. ओमिक्रॉनच्या बाबतीत आपण अधिक काळजी घ्यायला हवी, परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर (RTPCR) अनिवार्य करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच, आता केंद्राशी चर्चा करुनच आता नवीन नियमावली येईल, असं ते म्हणाले.

 

काल केंद्र सरकाराचे आणि आपल्या नियमावतील थोडीशी तफावत होती, पण रात्री उशीरा एकसारखे नियम असावेत यावर चर्चा झाली.
परदेशातून भारतातील विमानतळावर प्रवासी आले तर एकसारखा नियम असावा असा प्रयत्न आपण केला आहे.
देश म्हणून एक नियम असायला हवेत. इतर राज्यातून येणाऱ्यांना 48 तासाचा आरटीपीसीआर रिपोर्ट (RTPCR report) दाखवावा लागतो.
आपण इतर राज्यात जातो तेव्हा RTPCR report लागतो, तर आपल्या राज्यात येण्यासाठीही लागेल. असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

 

दरम्यान, राज्यातील शाळांसंदर्भात वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याशी चर्चा झाली आहे.
1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय झाला तेव्हा नवा विषाणू नव्हता.
मुलांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. काहीजण 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करायचे म्हणत होते.
मुंबई महापालिकेने तसा निर्णय घेतला आहे. मुंबईचा कायदा वेगळा आणि इतर महापालिकांचा कायदा वेगळा आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | maharashtra corona new guidelines rtpcr mandatory for people coming from foreign countries ajit pawar big statement about schools marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sangli News | सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका ! शेती, द्राक्षांच्या बागा पाण्यात, शेतकरी चिंतेत

Indrani Balan Foundation | ‘आयसर’मध्ये इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिविटी सेंटरच्या उभारणीसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनकडून 23 कोटी रुपयांची देणगी 

Supreme Court | मुलगा मोठा होईपर्यंत त्याच्या पालन-पोषणासाठी पिता जबाबदार – सर्वोच्च न्यायालय