Ajit Pawar | ‘मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसणाऱ्यांनी राज्याचा विचार करावा, तुम्ही तुमच्या मुलांच्या वयाच्या नेत्यांवर…’, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Shiv Sena chief Uddhav Thackeray) टीकास्त्र डागले. त्यांनी ठाकरे गटाकडून वारंवार होत असलेल्या टीकांचा चांगलाच समाचार घेतला. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांची आठवण करुन दिली. तसेच तुमचे मोदी आणि शाह यांच्यासोबत चागंले सबंध झाले आहेत. त्यातून राज्याच्या भल्यासाठी काय नवीन आणता येईल, ते पहा… असा टोला अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्र्यांना लगावला.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मागचं जे अधिवेशन झालं त्यातील अनेक दाखले देत आहात. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला बहुमत मिळालं आहे. त्यातून तुम्ही बाहेर या, त्यात रमू नका. लोकांना हे आवडत नाही, लोकांना काम रोजगार पाहिजे, असा टोला एकनाथ शिंदेंना लगावला. तुमच्या मुलांच्या वयाच्या नेत्यांवर तुम्ही टीका करता. मुलं आहेत सोडून द्या ना.. तुमच्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना प्रवक्ते म्हणून बोलायला सांगा ना.. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्यांनी राज्याचा विचार करावा, असा सल्ला देखील अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

 

ज्यांना सोडून तुम्ही आलात…
ते पुढे म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी काय घडलं? हे महाराष्ट्राला माहित आहे. आज त्या घटनेला सहा महिने झाले. सभागृहामध्ये तीस वर्षापासून आलोय. शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुलोद सरकार (Pulod Government) स्थापन केले होते. पण अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भाषणं कधीच राजकीय नसतात. एखादा दुसरा टोला लगावला तर मी समजू शको. पण सभागृहात मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाषण केलं. ज्यांना सोडून तुम्ही आलात, ते वृत्तपत्रामध्ये काही लिहिणार अन् तुम्ही मनाला लावून घेणार… अन् ते तुम्ही इथं सांगणार.. ते आम्हाला काय देणंघेणं आहे, असा हल्लाबोल अजित पवारांनी केला.

प्रवक्त्यांना आता जबाबदारी द्या
मागच्या काळामध्ये झालं… झालं गेलं गंगेला मिळालं. उकिरडा कितीही उकरला तरी त्यातून काही निघणार नाही…
तेच तेच सांगत बसण्यापेक्षा नवीन वर्ष 2023 सुरु होतंय. राज्याचे प्रमुख या नात्याने निर्णय घ्या.
कुणी काही बोलत असतील, तर ते माझे प्रवक्ते बघतील. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आहेत ना वस्ताद बोलायला,
ते आठी पडू देत नाहीत, हसत नाहीत, रडत नाहीत. शांतपणे उत्तर देत असतात.
जिथे खोच मारायची तिथे बरोब्बर मारतो. अशी चांगील आम्ही तयार केलेली माणसं तुम्ही घेतली आहेत,
त्यांच्यावर जबाबदारी द्या, असा चिमटा अजित पवारांनी काढला.

 

Web Title :- Ajit Pawar | maharashtra nagpur assembly winter session ajit pawar slam eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrashekhar Bawankule | छलकपटाने सत्तेत आलेल्या सरकारचा वचपा निसर्गाने काढला, चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

Gopichand Padalkar | ‘आता आरक्षण बस झालं’ शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन पडळकरांचा हल्लाबोल म्हणाले-‘हे आरक्षणाच्या विरोधात, त्यांचा खरा चेहरा…’

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री खोटे बोलले, वीज तोडल्या प्रकरणी शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार