Ajit Pawar | बारामतीमध्ये अजित पवारांना गावबंदी? मराठा क्रांती मोर्चा आक्रमक! पोलीस आणि संबंधिताना दिले निवेदन

बारामती : Ajit Pawar | चाळीस दिवसांचा वेळ देऊनही शिंदे-फडणवीस-पवार सरकारने (Shinde-Fadnavis-Pawar Government) मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) निर्णय न घेतल्याने मराठा आंदोलन आता तीव्र झाले आहे. जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्यभर साखळी उपोषण आणि गावबंदी आंदोलन सुरू झाले आहे. याचा फटका राजकीय नेत्यांना बसू लागला आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा (Ajit Pawar) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Cooperative Sugar Factory) मोळी पूजनाचा कार्यक्रम आता गावबंदीमुळे अडचणीत आला आहे.

शनिवारी २८ तारखेला माळेगांव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) या कार्यक्रमाला विरोध केला आहे. राजकीय व्यक्तींना सर्वत्र गावबंदी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास तीव्र विरोध करण्यात येत आहेत. अजित पवार यांनी या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरुवात उसाची मोळी टाकून करू नये, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाने माळेगाव साखर कारखाना प्रशासन आणि माळेगावच्या पोलीस ठाण्याला याबाबतचे लेखी निवेदन दिले आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखले जाणार का, हे उद्याच स्पष्ट होईल.

बारामतीमध्ये मराठा समाज आक्रमक
बारामती शहर आणि तालुक्यात रविवारी (दि २९) पासुन साखळी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय बारामती मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. टप्प्याटप्पाने १६ गावांत हे साखळी उपोषण होणार आहे. यामध्ये साखळी उपोषण, एक दिवस लाक्षणिक अन्नत्याग आंदोलनाचा समावेश आहे.

असे होईल साखळी अन्नत्याग आंदोलन

 • बारामती शहर आणि तालुका
  रविवारी २९ ऑक्टोबर
 • खांडज, मळद, पाहुणेवाडी, नीरावागज, घाडगेवाडी
  सोमवारी ३० ऑक्टोबर
 • सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, लाटे, शिरश्णे, बजरंगवाडी
  मंगळवारी ३१ ऑक्टोबर
 • माळेगाव, माळेगाव खुर्द, पणदरे, ढाकाळे, सोनकसवाडी
  बुधवारी १ नोव्हेंबर

मराठा क्रांती मोर्चाने माहिती दिली की, बारामती शहरात नवीन प्रशासकीय भावनासमोर मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य
एक दिवस लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन करतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Female Police Officer Suspended In Pune | पुण्यातील महिला पोलिस अधिकारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

Maratha Reservation | मराठा आरक्षण : जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद!

ACB Trap Case News | 1 लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात