Ajit Pawar Meeting With Former Corporator In Pune | अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची बैठक, पण धक्का मात्र भाजपच्या माजी नगरसेवकांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar Meeting With Former Corporator In Pune | तब्बल वर्षभरानंतर पुन्हा राज्यातील सत्तेत परतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच सोबत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना बळ द्यायला सुरूवात केली आहे. आज माजी नगरसेवकांची बैठक घेत त्यांच्या प्रभागात प्रलंबित असलेल्या कामांची यादी घेत, प्राधान्यक्रमाने या कामांसाठी निधी देण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना दिले. दरम्यान, केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी ‘लोकसभा’ निवडणुकीसाठी पारंपारिक विरोधक अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) गट सोबत घेण्याचा निर्णय भाजपच्या तळातील कार्यकर्त्यांसाठी कसा तापदायक ठरणार? याचा श्रीगणेशा आज झाल्याची प्रतिक्रिया स्थानीक भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येउ लागली आहे. (Ajit Pawar Meeting With Former Corporator In Pune)

पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी मागील दोन दिवसांत कालवा समितीची बैठक, पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि जिल्ह्यातील कामांचा मॅरेथॉन आढावा घेत बैठकांच्या आयोजनाचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळीनंतर स्वत: पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर केल्याने अजित पवार यांची संघटनात्मक जबाबदारी देखिल वाढली आहे. एकीकडे भाजप-शिवसेना सरकारमध्ये विकासासाठी सहभागी होत असताना स्वत:च्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी अजित पवार यांनी पुणे हा बालेकिल्ला निवडला. आज सर्किट हाउस येथे झालेल्या बैठकीमध्ये शहर अध्यक्ष दिपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली पाच- सहा माजी नगरसेवक वगळता सर्वांना एका छताखाली आणण्याची किमया त्यांनी साधली. एवढेच नव्हे तर दीड वर्षात प्रशासकराज मुळे या नगरसेवकांच्या रेंगाळलेल्या प्रकल्पांची यादी घेत प्राधान्यक्रमानुसार ती कामे पुर्ण करण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांना त्यांनी दिले. (Ajit Pawar Meeting With Former Corporator In Pune)

भाजप- शिवसेना (एकनाथ शिंदे)- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे नेते तूर्तास तरी लोकसभा निवडणुकीवर
(Lok Sabha Elections) आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत. विधानसभा आणि महापालिका व स्थानीक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत त्या-त्यावेळी ठरवू असे जाहीरपणे सांगत आहेत.
यामुळे सर्वाधीक गोंधळ उडालाय तो भाजपच्या दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये.
शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती झाली असली तरी शहरात त्यांची फारशी ताकद नसल्याने भाजपचे इच्छुक काहीसे
निर्धास्त होते. मात्र, पुणे महापालिकेत सत्ता राबविलेला व मागील पाच वर्षातील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीसोबत
युती केल्याने भाजपचे इच्छुक गलितगात्र झाले आहेत. महिन्याभरापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी पुढील महापौर राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच असेल अशी घोषणा केली होती. अजित पवार यांनी त्या घोषणेला अनुसरून कार्यवाही सुरू केल्याने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा उठला आहे. राष्ट्रीय राजकारणातील बेरजेसाठी मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या का? असे कार्यकर्ते खाजगीत बोलू लागले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कात्रज परिसरातील चामुंडामाता मंदिरातील दागिने चोरणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, 2 लाख 60 हजाराचा ऐवज जप्त (Video)