Ajit Pawar | भुजबळ-जरांगे वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया, ”समाजात तेढ निर्माण होईल…”

बारामती : Ajit Pawar | मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते आणि आरक्षणाविरोधात राज्य सरकारमधीलच एक कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थेट सभा घेऊन आवाज उठवत असल्याने ओबीसीविरूद्ध मराठा असा वाद सुरू झाला आहे. आज हिंगोली येथे दुसरी ओबीसी सभा पार पडली. यावेळी देखील भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या वादाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते बारामतीमध्ये जनता दरबारानंतर बोलत होते.

अजित पवार म्हणाले, सुसंस्कृत महाराष्ट्राची घडी यशवंतराव चव्हाण यांनी बसवली. त्या पद्धतीने अनेक जणांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले. अनेक जण वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत. त्यांना तो अधिकार घटनेने दिला आहे. पण आता विकासाचे प्रश्न बाजूला राहत आहेत. पण समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये. प्रत्येकाने आपआपली भूमिका मांडावी.

विकास प्रकल्प आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेती क्षेत्राबाबत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मिलेट व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटने फूड इनक्यूबेशन सेंटर प्रकल्प बारामतीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याची मान्यता दिल्यानंतर सोलापूरमध्ये अशी माहिती देण्यात आली की, तिकडचा प्रकल्प बारामतीत आणला.
पण तिकडचा प्रकल्प इकडे आणला नाही.

अजित पवार म्हणाले, राज्यात काम करत असताना मतदारसंघातील तसेच सगळ्यांची कामे झाली पाहिजेत.
४० दुष्काळी तालुक्यात बारामतीचा समावेश झाला आहे, समावेश केला नाही.
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर ज्याकाही सवलती दिल्या जातात त्या मिळतील.

अजित पवार पुढे म्हणाले, जे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत,
त्यांचा केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. किती निधी मागितला हे आत्ताच मी सांगणार नाही.
ज्यावेळेस सरकारची मदत मिळेल त्यावेळेस सांगेन. पण ज्या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे,
त्या ठिकाणी राज्य सरकारला खर्च करावा लागेल आणि त्याचा खर्च उचलायची राज्य सरकारची तयारी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ओबीसींची राजकीय ताकद मजबूत करण्याचे जानकरांचे भुजबळांना आवाहन, म्हणाले – ‘मुंडे आणि तुम्ही…’