Pune Crime | मंगळवार पेठेत एकमेकांकडे पाहण्यावरुन सराईत गुन्हेगारांच्या 2 टोळ्यांमध्ये राडा, 8 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये (Pune Criminal Gangs) वाद होऊन एकमेकांना कोयत्याने मारहाण (Beating) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) मंगळवार पेठेत (Mangalwar Peth) घडली आहे.
याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) परस्परविरोधी गुन्हे (FIR) दाखल केले आहेत.
पोलिसांनी (Pune Police) 3 सराईत गुन्हेगारांसह 8 जणांना अटक (Arrest) केली आहे.
हर्षल विठ्ठल शेलार (Harshal Vitthal Shelar) आणि अक्षय सतीश जंगम (Akshay Satish Jangam) या दोघांनी परस्परविरोधी तक्रार दिली आहे.

 

फरासखाना पोलिसांनी हर्षल विठ्ठल शेलार (वय – 28 रा. शेलार हाईटस (Shelar Heights), मंगळवार पेठ) याच्या तक्रारीवरुन युवराज गुंजाळ (Yuvraj Gunjal), आकाश खैरमोडे (Akash Khairmode), शुभम झोळ (Shubham Jhol), अक्षय जंगम व त्यांचा एक साथिदार यांच्याविरुद्ध आयपीसी 143, 147, 148, 149, 324, 504 आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
तर अक्षय सतीश जंगम (वय – 23 रा. रामायण मित्र मंडळासमोर, मंगळवार पेठ) याच्या तक्रारीवरुन हर्षल विठ्ठल शेलार (वय – 30), पवन विठ्ठल शेलार Pawan Vitthal Shelar (वय – 32), विठ्ठल शेलार Vitthal Shelar (वय – 61 तिघे रा. मंगळवार पेठ) यांच्या विरुद्ध आयपीसी 326,504,506 आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अक्षय जंगम, शुभम झोळ आणि हर्षल शेलार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
हा प्रकार गुरुवारी मंगळवार पेठेतील हर्षल हाईट्स बिल्डिंग समोर रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल शेलार हा रिक्षात बसला होता. त्यावेळी एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून युवराज गुंजाळ याच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी हर्षल याला शिवीगाळ केली. तसेच त्याचे वडिल आणि भावाला कोयत्याने मारहाण करुन जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हर्षल याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

 

तर अक्षय जंगम याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय आणि हर्षल यांच्यात नवलाका ट्रेडर्ससमोर एकेमकांकडे पाहण्यावरुन वाद झाला.
आरोपी हर्षल याने शुभम झोळ याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill)
देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
तसेच शेलार हाईटस बिल्डिंग समोर अक्षय व शुभम झोळ हे आरोपी विठ्ठल शेलार यांना समजावून सांगण्यासाठी गेले होते.
त्यावेळी आरोपींनी अक्षय आणि शुभमला कोयत्याने मारहाण करुन जखमी केले.
तसेच शुभम याला पकडून हातातील कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण करुन शुभम याला सोडवण्यासाठी कोणी आल्यास त्याला सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अक्षय जंगम याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास फरासखाना पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | 8 arrested in 2 gangs of pune criminals for looking at each other in mangalwar Peth Faraskhana Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा