Ajit Pawar On Builders In Pune | तुमची मुले रात्री कुठे जातात, काय करतात ? अजित पवारांचा बिल्डरांना सवाल

पुणे : Ajit Pawar On Builders In Pune | कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताबाबत (Pune Porsche Car Accident) विविध स्तरातून चर्चा होत आहेत. समाजमाध्यमातूनही या घटनेला घेऊन बोलले जात आहे. त्यातच आपल्या पाल्यांकडे पालकांचे लक्ष असते का? त्यांचे कोणते लाड पुरवले जातात? याबाबतही आता चर्चा केल्या जात आहेत. (Kalyani Nagar Accident)

या घटनेला घेऊन विविध स्तरातून रोष ही व्यक्त केला गेला. अल्पवयीन मुलाला अशी महागडी गाडी चालवण्यास दिलीच कशी ? त्याला पब मध्ये जाण्याची परवानगी का दिली ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

यातच आता अजित पवारांनी बारामतीतील एका कार्यक्रमात पालकांना काही सवाल केले आहेत. ” पुणे, नागपूर, जळगावमध्ये गेल्या काही दिवसात अपघाताच्या मोठ्या घटना घडल्या. यामध्ये आता आपल्या पालकांनी आपली मुले व्यवस्थित राहतात का ? रात्री कुठे जातात ? काय करतात ? याकडे सगळ्याच पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. डिपार्टमेंट त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी काम करेल. पण, आपला मुलगा चुकणार नाही याची काळजी घ्या. आपल्याकडे मुलांचे लाड जास्त करतात. मग केलेल्या लाडाची किंमत मोठी मोजावी लागते, आता अशा घटना घडत आहेत, कोणत्याही परिस्थितीत कायदा, नियम सगळ्यांना सारखा आहे. तो श्रीमंत बापाचा मुलगा असुदे किंवा कुणाचाही मुलगा असुदे. यामध्ये कुणीही चुका केल्या असतील तर सोडले जाणार नाही. कायदा आणि नियम श्रेष्ठ आहे. आपण सर्वांनी काळजी घ्यावी. बारामतीमध्ये काही मुले चुकीची वागत असतील तर लक्षात आणून दिले पाहिजे. आपण सर्वांनी काळजी घेऊया,” असे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…