Ajit Pawar on Buldhana Bus Accident | ‘अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून…’, अजित पवारांचा राज्य सरकारला सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar on Buldhana Bus Accident | समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) खासगी प्रवासी बसला भीषण अपघात होऊन बसने पेट घेतला. या अपघातात 25 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ रात्री दीडच्या सुमारास (Buldhana Bus Accident) झाला. यानंतर या अपघातावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेवर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात, असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) सल्ला दिला आहे. (Ajit Pawar on Buldhana Bus Accident)

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा सिंदखेडराजा येथे अपघात होऊन 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला असल्याचे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar on Buldhana Bus Accident)

अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्यानं यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. तसेच आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असेही अजित पवार म्हणाले.

समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्याने करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

कठोर नियम करावेत – जयंत पाटील

बुलढाणा येथील अपघातावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खाजगी प्रवासी बसने पेट घेतल्याने प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण राष्ट्रवादी परिवार सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली…

जखमी झालेल्या प्रवाशांना योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत. समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात हा कळीचा मुद्दा बनला आहे. खासगी वाहनांची सुव्यवस्था आणि वेग मर्यादा यावर सरकारने कठोर नियम करणे गरजेचे आहे, असे जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Web Title :  Ajit Pawar on Buldhana Bus Accident | the government should think seriously now ajit pawar advised after the accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Kajal Aggarwal | दाक्षिणात्य अभिनेत्री काजलने शेअर केली रकुल प्रित सिंग, समंथा आणि तमन्नासाठी खास स्टोरी

Buldhana Bus Accident | ‘…ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे’, संजय राऊतांच्या टीकेला राणा दाम्पत्याचे प्रत्युत्तर

Top Monsoon Getaways near Pune: Explore Nature’s Beauty and Adventure

CM Eknath Shinde | ‘वाढते अपघात लक्षात घेता, भविष्यात आवश्यक ते सर्व केले जाईल’, बुलढाणा अपघातस्थळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Uddhav Thackeray on Buldhana Accident | या अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, बुलढाणा दुर्घटनेवरुन उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

Disha Patani | अवॉर्ड नाईटमधील रिव्हिलिंग ड्रेसने दिशा पाटनीवर खिळल्या नजरा; चाहत्यांनी केल्या कमेंटस्