Beed News | जाळपोळ करणार्‍या गुंडावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात केली रवानगी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed News | मराठा आरक्षणातील (Maratha Reservation) जाळपोळीत सहभाग असलेल्या बीड शहरासह तालुक्यात दहशत माजविणार्‍या गुंडावर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई (MPDA Action) केली आहे. त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. (Beed News)

समाधान बाबुराव खिंडकर (वय २८, रा. बेलवाडी, ता. जि. बीड) असे या गुंडाचे नाव आहे.

समाधान खिंडकर याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न करणे, जाळपोळ करणे, दंगा करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे, दरोड्याची तयारी करणे, अवैध शस्त्र बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे, दरोडा टाकणे अशा गंभीर स्वरुपाचे ६ गुन्हे दाखल होते. बीड शहरासह तालुक्यात दहशत होती. मराठा आरक्षण आंदोलनात झालेल्या जाळपोळीतही त्याचा सहभाग दिसून आला होता.

पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीखक कैलास भारती यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडे पाठविला. दीपा मुधोळ यांनी त्याची पडताळणी करुन प्रस्तावाला मंजुरी दिली. पोलिसांनी समाधान खिंडकर याला ताब्यात घेऊन त्यांची रवानगी हार्सुल कारागृहात केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi In Maharashtra | PM मोदींचा आज झंझावाती महाराष्ट्र दौरा, नाशिकमध्ये रोड शो, नवी मुंबईत अनेक कामांचे उद्घाटन

पुणे : मोठा फायदा करुन देण्याच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक, दोघांवर FIR

पुणे : रेल्वे, पुणे मनपामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक, दाम्पत्यावर FIR

येरवडा कारागृहातील सराईत गुन्हेगाराचा भररस्त्यात वाढदिवस साजरा, पाच जण ताब्यात; जनवाडी परिसरातील घटना

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, बापावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा; हडपसर परिसरातील घटना

लाच घेताना तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अ‍ॅन्टी करप्शच्या जाळ्यात

माण- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला शिवाजीनगर न्यायालयाची जागा मिळाली